पाटो रस्त्याला पडलेला खड्डा त्वरित बुजवण्याची गरज आहे. Dainik Gomantak
गोवा

पेडणे पाटो रस्त्याची चाळण

पेडणे पाटो रस्त्यात भलामोठा पडलेला खड्डा आणि वाहतुकीची होणारी कोंडी याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

दैनिक गोमन्तक

मोरजी: पेडणे सार्वजनिक बांधकाम रस्ता विभागाचे कार्यालय 50 मीटरवर असूनही पाटो रस्त्याला पडलेला भला मोठा खड्डा अधिकाऱ्याना दिसत नाही. त्याबद्दल नागरिक नाराजी व्यक्त करत आहे. गुरुवार हा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचा दिवस त्याच दिवशी पोलीस ट्राफिक उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या जनता दरबाराची वाहतूक व्यवस्था पाहण्यासाठी मग्न होती. मात्र या ठिकाणी भलामोठा पडलेला खड्डा आणि वाहतुकीची होणारी कोंडी याकडे कुणाचे लक्ष गेले नाही. त्याबद्दल वकील जितेंद्र गावकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.

या पूर्वी पेडणे पालिका क्षेत्रातील पोर्तुगीज कालीन पाटोपूल व जोडरस्ता 6 जुलै, 2018 रोजी कोसळून सलग पाच दिवस सर्वप्रकारची वाहतूक या रस्त्यावरून बंद झाली होती. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होवून नागरिकाना विनाकारण दूरवरच्या पर्यायी रस्त्यातून जावून आपली नियोजित कामे करावीलागत होती, त्याची पुन्हा पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत.

पुनरावृत्ती टाळा

6 जुलै 2018 रोजी पाटो पूल रस्ता कोसळल्याने जरी दुर्घटना घडली नसली तरीही सर्वसामान्य नागरिकांना ज्या समस्यांना सामोरे जावे लागले त्याचा अंदाज नागरिकांकडे विद्यार्थ्यांकडे संपर्क साधला असता येतो. दरम्यान आता नवीन बसस्थानक समोर असाच पोर्तुगीज काळातील पूल मुख्य रस्त्यावर उभा आहे , या पुलाचे बांधकाम दगडी फिचाणी जुन्या पद्धतीने बांधकाम केले आहे. आतून या पुलाला भेगा पडलेल्या आहेत, सभोवताली पूर्ण वेलींनी हा पूल लपला गेल्याने त्याचा अंदाज येत नाही, हा पूल कोसळला तर मोठी गंभीर समस्या निर्माण होवू शकत , हा पूल कोसळला तर पर्यायी रस्ते असले तरी ते रस्ते अरुंद व धोकादायक स्थितीतील असल्याने वाहतुकीची कोंडी होवून त्याचा त्रास आणि मनस्ताप स्थानिक राहिवासियांना सोसावा लागणार आहे, त्यासाठी सरकारने आणि उपमुख्यमंत्री मंत्री बाबू आजगावकर यांनी लगेच या रस्त्यावरील पुलाच्या बांधकामाविशाई पाऊले उचलायला हवीत .

मागच्या 2018 साली पोर्तुगीज कालीन पूल कोसळला त्या पुलावर जर वेळीच सरकारने लक्ष दिले असते तर तोही पूल कोसळला नसता अशी नागरिक प्रतिक्रिया देताना परत दुसरा पूल कोसळून त्याची पुनरावृत्ती होण्याची टाळावी अशी मागणी करत सरकार नको ठिकाणी पैसा खर्च करतो , आता हे दोन्ही जुनाट पूल नवीन स्थितीत बांधावे अशी मागणी केली

सुशोभीकरण योजनेत पुलाचे काय ?

पर्यटनमंत्री तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी सहा कोटी खर्च करून मालपे पेडणे ते व्हायकाऊट हायस्कूल पर्यंतच्या रस्त्याचे पर्यटन दृस्ठ्या सुशोभीकरण करण्याची योजना आखलेली आहे , हे काम पर्यटन खात्या अंतर्गत करण्यात येणार असून या योजने अतर्गत काम करण्यात येणार आहे . मात्र या रस्त्यावर जी दोन पौर्तुगीज कालीन पूल आहेत त्याच्या दुरुस्ठीचा समावेश करावा लागेल अगोदर दोन्ही पुलांची नवीन पद्धतीने बांधकाम करून नंतर सुशोभीकरणाचे काम हाती घ्यावे अशी मागणी होत आहे .या सुसोभिकारानाचा 2018 साली शुभारंभ केला त्याचा आजपर्यंत पत्ता नाही .

बाय पास रस्त्याचे काय झाले ?

पेडणे शहरातील दिवसेंदिवस होणारी वाहतूक कोंडी रस्त्यावर वाहनांचा ताण ,शहरातील अरुंद असलेले रस्ते ,भविष्यात अधिक कोंडी नको यासाठी मागच्या दहा वर्षापूर्वी शहरापासून बायपास रस्ता करण्याची योजना होती , मात्र हि योजना किंवा बायपास रस्ता आज पर्यंत केला नाही त्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे .

पेडणे पालिकेचे दुर्लक्ष

पेडणे पालिका क्षेत्रातील हे दोन्ही जुनाट पुलाच्या बांधकामाविषयी आजपर्यंत कोणतीच पाऊले उभारलेली नाहीत किंवा पालिकेचा महसूल वाढवावा यासाठी कोणत्याची नवीन योजना राबवल्या गेल्या नाहीत त्याबद्दल नागरिक नाराजी व्यक्त करीत आहे .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT