Kadamba Electric Bus Dainik Gomantak
गोवा

Kadamba Transport: कदंब बससाठी गोव्यात चालक मिळेनात? कर्नाटकात झळकली जाहीरात

Kadamba Transport Corporation Goa: गोव्यात अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने कंपनीने कर्नाटकात चालकांचा शोध घेण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे.

Pramod Yadav

Kadamba Transport Corporation Goa

पणजी: गोव्यातील रस्त्यावर Electric बस धावण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने सर्वच बस Electric करण्याचा निर्णय घेतल्याने आगामी काळात यात मोठ्या संख्येने वाढ होणार आहे. दरम्यान, बसची संख्या वाढली तरी त्यासाठी आवश्यक चालक कदंब महामंडळाला गोव्यात मिळेनासे झालेत. अलिकडेच याबाबत एक जाहीरात कर्नाटकात झळकली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, गोव्यात धावणाऱ्या Electric बससाठी चालक हवे आहेत, अशी जाहीरात कर्नाटकमध्ये झळकली आहे. Electric बससाठी गोव्यात चालक मिळत नसल्याने आता शेजारी कर्नाटकात चालकांचा शोध घेतला जात आहे.

कर्नाटकात झळकलेली जाहीरात ओलेक्ट्रा कंपनीने प्रसिद्ध केल्याची माहिती समोर आली आहे. सर्वप्रथम गोव्यातच याबाबत जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. पण, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने कंपनीने कर्नाटकात चालकांचा शोध घेण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे.

कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी कर्नाटकात प्रिसिद्ध झालेल्या जाहीरातीची माहिती देताना कंपनीने ती प्रसिद्ध केल्याचे सांगितले.

ओलेक्ट्रा कंपनीसोबत झालेल्या करारानुसार Electric बसचे चार्चिंग, देखभाल आणि चालकांच्या नियुक्तीची जबाबदारी कंपनीकडे आहे. तर या बसमधील वाहक कदंबचे कर्मचारी असतील. चालक हवे असल्याची जाहीरात गोव्यात देखील प्रसिद्ध करण्यात आली होती पण, त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कंपनीने कर्नाटकात जाहीरात प्रसिद्ध केल्याचे स्पष्टीकरण तुयेकर यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT