Dhangar Festival Advalpale Dainik Gomantak
गोवा

Dhangar Festival : अडवलपाल येथे घडला लोकनृत्यांचा आविष्कार; ‘धनगर महोत्सव’ उत्साहात

Dhangar Festival : गुणवंतांचा गौरव

गोमन्तक डिजिटल टीम

Dhangar Festival : डिचोली, लोकनृत्यांचा आविष्कार आणि अन्य कार्यक्रमांसह अडवलपाल येथे सहावा ‘धनगर महोत्सव’ उत्साहात साजरा करण्यात आला.

कला आणि संस्कृती खात्याच्या सहकार्याने डिचोली तालुका गोमंतक धनगर समाजोन्नती मंडळातर्फे धनगरवाडा-अडवलपाल येथील श्री विठ्ठल रखुमाई संस्थानात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून लोककलाकार गोपीनाथ गावस तर खास अतिथी म्हणून माजी आमदार नरेश सावळ उपस्थित होते. अन्य मान्यवरांत धनगर समाजोन्नती मंडळाचे डिचोली तालुका अध्यक्ष दिलीप वरक, उपाध्यक्ष गंगाराम वरक आदींचा समावेश होता. मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‌घाटन करण्यात आले.

या महोत्सवात दहावी, बारावी, पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेत ५०हून अधिक टक्के गुण प्राप्त केलेल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी मंडळाच्या दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

या महोत्सवात लोकनृत्यांचा आविष्कार घडला. धनगरी गजानृत्य आदी विविध लोकनृत्यांचे सादरीकरण करण्यात आले. दिलीप वरक यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. ऐश्वर्या नायर यांनी सूत्रसंचालन केले. लक्ष्मण लांबोर यांनी आभार मानले.

वेशभूषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेत लहान गटात निष्कर्ष कुडासकर याने प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे बक्षीस अनुक्रमे आर्यन वरक आणि आतिष झोरे यांना प्राप्त झाले.

मोठ्या गटात यश वरक याने प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे बक्षीस अनुक्रमे सिद्धेश लांबोर आणि नरेश वरक यांना प्राप्त झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT