Advalpal Sarpanch Issue Dainik Gomantak
गोवा

Advalpal: अडवलपाल पंचायतीत सत्तासंघर्षाचे नाट्य! माजी आमदार सावळ सक्रिय; मुख्यमंत्री सावंत यांची घेतली भेट

Advalpal Panchayat: सरपंचपद रिक्त झालेल्या अडवलपाल पंचायतीत सध्या सत्तासंघर्षाचे नाट्य सुरु झाले असून या नाट्यात माजी आमदार नरेश सावळ हेदेखील सक्रिय झाल्याची माहिती आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Naresh sawal meeting cm pramod sawant Advalpal Sarpanch

डिचोली: सरपंचपद रिक्त झालेल्या डिचोली मतदारसंघातील अडवलपाल पंचायतीत सध्या सत्तासंघर्षाचे नाट्य सुरु झाले असून या नाट्यात माजी आमदार नरेश सावळ हेदेखील सक्रिय झाल्याची माहिती आहे.

अडवलपाल पंचायतीच्या पाचपैकी चार पंचसदस्यांना सोबत घेऊन सावळ यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली आहे. त्यामुळे या पंचायतीवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी माजी आमदारांनी कंबर कसल्याचे स्पष्ट झाले.

सरपंचपदाची निवडणूक घ्या

अडवलपाल पंचायतीचे पदच्युत सरपंच गजानन पालकर यांच्यासह विद्यमान उपसरपंच विनश्री गावकर, सुबत्ता सामंत आणि गीतेश गडेकर यांच्यासह नरेश सावळ यांनी आज (शनिवारी) साखळी येथे सावंत यांची भेट घेतली आहे. अडवलपाल पंचायतीचे सरपंचपद रिक्त झाल्यास बावीस दिवस उलटून गेले आहेत.

मात्र अद्याप रिक्त सरपंचपदासाठी निवडणूक जाहीर झालेली नाही. त्यामुळे विकासकामांवर परिणाम होत आहे. असे या गटाने मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. सरपंचपदासाठी लवकर निवडणूक घ्यावी, अशी मागणी या गटाने मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, स्थानिकांचा विरोध असताना खाणीला ‘एनओसी’ दिल्यामुळे अडवलपाल पंचायतीचे सरपंच गजानन पालकर यांना सरपंचपद गमवावे लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT