Hotel Management Courses Dainik Gomantak
गोवा

Hotel Management Course: 'माई इन्स्टिट्यूट' आता सावंतवाडीत, हॉटेल उद्योगातील उज्ज्वल करिअरसाठी सुवर्णसंधी, पात्रता जाणून घ्या

Hotel Management: देशातील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगाने वाढत असलेल्या पर्यटन व हॉस्पिटॅलिटी उद्योगासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मळगाव-सावंतवाडी ही संस्था कार्यरत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: देशातील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगाने वाढत असलेल्या पर्यटन व हॉस्पिटॅलिटी उद्योगासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मळगाव-सावंतवाडी ही संस्था कार्यरत आहे. या शैक्षणिक वर्षासाठी बी.एससी., डिप्लोमा आणि सर्टिफिकेट अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

ही संस्था राष्ट्रीय हॉटेल व्यवस्थापन व केटरिंग तंत्रज्ञान परिषद, नोएडा यांच्याशी संलग्न असून, भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे. येथे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू), नवी दिल्ली येथून पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येते.

संस्थेच्या व्यवस्थापनाने देशातील नामांकित पंचतारांकित हॉटेल्ससोबत सामंजस्य करार केले असून, विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण केल्यानंतर थेट नोकरीची संधी दिली जाते. यामध्ये भारतातील तसेच मॉरिशस, अमेरिका, फ्रान्स, सिंगापूर, मलेशिया, दुबई अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील हॉटेल्सचा समावेश आहे. कर्मा हॉस्पिटॅलिटी ग्रुप अंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण काळातच प्रत्यक्ष औद्योगिक प्रशिक्षण दिले जाते. संस्थेचा तिन्ही एकरांहून अधिक विस्तीर्ण व निसर्गरम्य परिसर आहे.

उपलब्ध अभ्यासक्रम

१) बी.एस्सी. (हॉस्पिटॅलिटी अ‍ॅण्ड हॉटेल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन), २) डिप्लोमा (फूड प्रॉडक्शन/बेकरी व कन्फेक्शनरी/फूड अ‍ॅण्ड बेव्हरेज सर्व्हिस), ३) अ‍ॅडव्हान्स सर्टिफिकेट (हॉस्पिटॅलिटी ऑपरेशन्स), ४) सर्टिफिकेट अभ्यासक्रम (फूड प्रॉडक्शन व पॅटिसरी/फूड अ‍ॅण्ड बेव्हरेज सर्व्हिस/हाउसकिपिंग).

आवश्‍यक पात्रता

पदवीधर व डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठी: इ.१२वी उत्तीर्ण (कोणतीही शाखा), सर्टिफिकेट अभ्यासक्रमांसाठी: इ.१०वी उत्तीर्ण. अधिक माहितीसाठी www.maihm.in या वेबसाईटला भेट द्या. प्रवेशासंदर्भातील प्रश्न admission@maihm.in या ई-मेलवर पाठवावे, असे संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: आठवडा विशेष: चंद्र राशीनुसार 'प्रेमसंबंध, आरोग्य आणि आर्थिक' स्थिती कशी राहील? सर्व 12 राशींचं भविष्य वाचा

Omkar Elephant: ओंकार हत्ती 'शांत'च! उपवनसंरक्षकांकडून 'अग्रेसिव्ह' चर्चांना पूर्णविराम, रेस्क्यूसाठी चार ठिकाणं निवडली

Gold Price: बाजारात महागाईचा तडाखा! सोन्याच्या दराने मोडले सर्व रेकॉर्ड; पहिल्यांदाच 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1 लाख 30 हजाराच्या पार

'खराब रस्त्यांच्या दुरुस्तीची सुरू, 15 दिवसांत काणे पूर्ण होणार'; आपच्या निवेदनानंतर CM सावंतांची माहिती

CM प्रमोद सावंतांविरोधात बदनामीकारक व्हिडिओ करणाऱ्या गौरव बक्शीला 50,000 दंड; कोर्टासमोर मागितली माफी

SCROLL FOR NEXT