villege |Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: ‘आदर्श संसद ग्राम’च्या बैठकीला आमदार, खासदारांना डावलले!

आदर्श संसद ग्राम योजनेखाली निश्‍चित केलेल्या वेळ्ळी गावाचा विकास करण्यासाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावली त्याचे आमंत्रण न दिल्याने आमदार क्रुझ सिल्वा यांना नाराजी व्यक्त केली.

दैनिक गोमन्तक

Goa Politics: आदर्श संसद ग्राम योजनेखाली निश्‍चित केलेल्या वेळ्ळी गावाचा विकास करण्यासाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी ज्योती कुमारी यांनी बोलाविलेल्या बैठकीला आमदार क्रुझ सिल्वा यांना आमंत्रण न दिल्याने त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. तसेच खासदार सार्दिन यांनाही डावलले.

या बैठकीला मला अथवा जिल्हा पंचायत सदस्यांना आमंत्रण नव्हते. उलट मागच्या निवडणुकीत ज्यांचा सपशेल पराभव झाला, त्या भाजप प्रवक्ते सावियो रॉड्रिग्ज यांना आमंत्रण देण्यात आले होते, याकडे सिल्वा यांनी लक्ष वेधले आहे.

या बैठकीत रॉड्रिग्ज हे सरकारी अधिकाऱ्यांना सूचना करत होते आणि अधिकारी त्यांच्या तालावर नाचत होते, असे म्हणून अधिकृत कार्यक्रमांत या भाजप कार्यकर्त्यांची लुडबुड कशी खपवून घेतली जाते, असा सवाल सिल्वा यांनी केला आहे.

खासदार सार्दिनही नाहीत

आदर्श संसद ग्राम योजनेचे भाजप सरकारने राजकारण केले असून ही योजना राबविताना खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनाही डावलण्यात आल्याने आपचे नेते वाल्मीकी नाईक यांनी म्हटले आहे.

नरेंद्र सावईकर हे दक्षिण गोव्याचे खासदार असताना वेळ्ळी गावाची या योजनेखाली निवड केली होती. आता सार्दिन हे दक्षिण गोव्याचे खासदार आहेत. ही योजना राबविताना त्यांना विश्वासात घेणे गरजेचे होते, असे नाईक यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar 2026: मंगळाचे पुष्य नक्षत्रात गोचर! 24 सप्टेंबरनंतर 'या' लोकांवर होणार धनाची बरसात; सकाळी 5:50ची वेळ ठरणार गेमचेंजर

8th Pay Commission Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी! 18000 मूळ वेतन असणाऱ्यांना मिळणार 68 हजारांपेक्षा जास्त बेसिक पे? फिटमेंट फॅक्टर बदलणार नशीब

150 वर्षांची परंपरा; तिसरी पिढीही मूर्तीकलेत व्यस्त, मोरजीतील पोके कुटुंबाची चित्रशाळा; पोर्तुगालमध्येही दिले शिल्पकलेचे धडे

इराणच्या हाती लागला मोठा 'जॅकपॉट'! सापडला 7.5 ट्रिलियन क्यूबिक फीट गॅसचा महाखजिना; नव्या हायड्रोकार्बन साठ्याने अमेरिकेचे दणाणले धाबे

Pre Primary Teachers Salary Hike: पगारवाढीच्या प्रतीक्षेत पूर्वप्राथमिक शिक्षिका, मुख्यमंत्र्यांकडे कैफियत; प्राथमिक शिक्षकांप्रमाणे वेतनवाढीची मागणी

SCROLL FOR NEXT