Actor Pankaj Tripathi At IFFI Goa 2023: संपूर्ण जग एक रंगभूमी आहे, आणि आपण सर्वजण आपआपल्या जीवनात वेगवेगळ्या भूमिका बजावत असतो. अभिनय म्हणजे वास्तविक जीवनातील भूमिकेची पुन्हा एकदा होणारी निर्मिती असते आणि त्यावेळी भावनांतून इतरांचे मनोरंजन केले जाते, असे मत प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी मांडले.
54 व्या इफ्फी अर्थात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आयोजित मास्टरक्लासमध्ये आयोजन केले होते. यावेळी पंकज त्रिपाठी बोलत होते. या सत्राचे सूत्रसंचालन प्रसिद्ध चित्रपट समीक्षक आणि पत्रकार मयंक शेखर यांनी केले.
“ज्यावेळी तुम्ही स्वत: दुस-या एखाद्या व्यक्तीच्या भूमिकेमध्ये शिरता आणि त्या व्यक्तीचे विचार, त्यांच्या भावना आणि त्यांचे दृष्टीकोन समजून घेता, तेव्हा तुम्ही एक चांगला माणूस बनता,” असं पंकज त्रिपाठी यावेळी म्हणाले.
तुमचा अभिनय नैसर्गिक वाटला पाहिजे, यासाठी शरीर आणि मन संतुलित ठेवण्याचे महत्त्व पंकज त्रिपाठी यांनी अधोरेखित केले.
“स्वतःला व्यक्तिरेखेनुसार घडवण्यासाठी मन आणि शरीराची लवचिकता आणि मोकळेपणा महत्त्वाचा आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
स्टार आणि अभिनेता यांच्यातला फरक सांगताना पंकज त्रिपाठी म्हणाले, "एक अभिनेता नेहमीच त्याच्या वाट्याला आलेल्या भूमिकेमध्ये नवे प्रयोग करण्याची संधी घेऊ शकतो. प्रयोगामुळे अभिनय जिवंत राहतो."
ज्यावेळी तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो, त्यावेळी अभिनय दुय्यम बनतो, असे ते म्हणाले. तथापि, कधी ना कधी पुढे जाउूच, अशी आशा मनात बाळगून होतो, पण केवळ आशा पुरेशी नाही, आत्म-मूल्यांकन देखील आवश्यक आहे. तुम्हाला हे का करायचे आहे हे स्वतःला विचारा,” असे त्रिपाठी पुढे म्हणाले.
प्रेक्षकामध्ये उपस्थित असलेल्या महत्त्वाकांक्षी, उदयोन्मुख कलाकार, अभिनेते आणि चित्रपट निर्मात्यांनी संशोधन, निरीक्षण आणि आपल्या भवतालच्या गोष्टींचे चिकित्सक दृष्टीने अन्वेषण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.