Actor Gaurav Bakshi Dainik Gomantak
गोवा

अभिनेता गौरव बक्शी पुन्हा अडचणीत, ओल्ड गोव्यात गुन्हा दाखल; मालमत्तेत घुसून धमकावल्याचा आरोप

Gaurav Bakshi case Goa: मालमत्ता वाद आणि सोशल मीडियावरील व्हिडिओच्या वादावरुन ही घटना घडल्याचे समोर आले आहे.

Pramod Yadav

पणजी: अभिनेता गौरव बक्शी पुन्हा अडचणीत सापडला आहे. जुने गोवा पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे. चोडण येथील मालमत्तेत बेकायदेशीरपणे घुसून धमकावल्याप्रकरणी बक्शीसह एका अनोळखी महिलेविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

याप्रकरणी श्याम भोमकर (५३) यांनी तक्रार दाखल केली आहे. बक्शी आणि एक महिला नोव्हेंबर ०२ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास बेकायदेशीरपणे घरात घुसले. कुटुंबीयांना धमकी दिली आणि वाईट परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली, असे भोमकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

मालमत्ता वाद आणि सोशल मीडियावरील व्हिडिओच्या वादावरुन ही घटना घडल्याचे समोर आले आहे. दरम्यान, बक्शी यांनी हा गुन्हा ‘वेस्ट ऑफ टाईम’ असल्याचे म्हटले आहे. पोलिसांकडून अद्याप याप्रकरणी कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती मिळाली नसल्याचेही बक्शी यांनी सांगितले.

“भोमकर यांच्याकडे मुंडकार अधिकार नसून, त्यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. अर्ध्या चोडणची मालकी आमच्याकडे आहे, असाही हा व्यक्ती दावा करतो. हे राजकीय सूडबुद्धीतून केल्याचे दिसते. गेल्या महिन्यात भाजपने माझ्याविरोधात खोटे आणि चुकीचे व्हिडिओ प्रसिद्ध केले. मी याप्रकरणी तक्रार दाखल केलीय”, असे बक्शी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT