Illegal Construction  Dainik Gomantak
गोवा

Goa Illegal Constructions: गोव्यातील महामार्गालगतच्या अवैध बांधकामांवर होणार कारवाई

कोमुनिदाद प्रशासकांकडून बार्देशातील 36 जणांना नोटीसा

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Illegal Constructions: गोव्यातील राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गाच्या शेजारी असलेल्या सखल भागात बेकायदेशीरपणे मातीचा भराव टाकून जमिन बुजविणे तसेच अवैध बांधकामांविरुद्ध कारवाईचा आदेश नुकताच सरकारने काढला होता.

त्यानुसार, संबंधित जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मामलेदारांकडून तातडीने कारवाईची मोहीम राबविली होती. याच पार्श्वभूमीवर या विशेष मोहिमेअंतर्गत बार्देश तालुक्यातील 36 जणांना कोमुनिदाद उत्तर क्षेत्र प्रशासकांनी कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे.

महामार्गालगत जागेत बेकायदेशीरपणे मातीचे भराव टाकून कोमुनिदाद मालकीची जमिन बुजविणे किंवा तिथे बांधकाम केलेल्या तब्बल 36 उल्लंघनकर्त्यांना या नोटीसा पाठविल्या असून यासंदर्भात 20 मार्च रोजी, उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासक कार्यालयात सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

अवैध बांधकाम किंवा मातीचा भराव टाकल्याचे आढळल्यास संबंधितांविरुद्ध 48 तासांत कारवाई करावी आणि यापुढे रस्त्यालगत बेकायदा बांधकामे उभी राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी असे या आदेशात सरकारने म्हटले होते.

त्यानंतर बार्देश उपजिल्हाधिकारी व मामलेदारांकडून तालुक्यातील विविध सकल भागांची तसेच महामार्गलगत बांधकामांची पाहणी केली होती. तेव्हा अनेकांनी नियमांचे उल्लंघन करुन बेकायदेशीरपणे कोमुनिदाद जमिनीत मातीचा भराव टाकून जमिन बुजविल्याचे निर्दशनास आलेले.

त्यानुसार, मामलेदारांनी अहवाल बनवून या उल्लंघनकर्त्यांवर कारवाई करण्याबाबत कोमुनिदाद उत्तर क्षेत्राचे प्रशासकांना सूचना केली. यानुसार कोमुनिदाद प्रशासकांनी संबंधितांना नोटीस बजावून 20 मार्च रोजी सकाळी 10.30 वा. आवश्यक कागदपत्रे घेऊन कार्यालयात सुनावणीस हजर राहण्याचे निर्देश दिलेत.

या गावांमध्ये उल्लंघनाचे प्रकार

बस्तोडा 2, नास्नोळा 20, सुकूर 5, रेवोडा 1, म्हापसा 3, साळगाव 1, गिरी 2, उसकई 1, साल्वादोर दी मुंद 1.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT