Goa Traffic Violations | MP Francisco Sardinha Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic Violations : बेदरकार वाहन चालकांवर कारवाई व्हायलाच हवी; खासदार फ्रान्सिस सार्दिन यांची मागणी

खराब रस्‍त्‍यांची दुरुस्‍ती करा; वीज दरवाढीला विरोधच

दैनिक गोमन्तक

MP Francisco Sardinha: हेल्मेट न घातलेल्यांवर, वाहन परवाना न बाळगणाऱ्या चालकांवर कारवाई व्हायलाच हवी, शिवाय जे अंदाधुंद वाहन चालवितात त्यांच्यावर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करावी, अशी सूचना दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी आज मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

गेल्या दोन महिन्यात ४०४ अपघात व ४१ अपघाती मृत्यू हे वाचून आपल्याला धक्काच बसला, असे सांगून सार्दिन म्हणाले की सरकारने अपघातग्रस्त ठिकाणांचे सर्वेक्षण करुन तिथे पोलिस कुमक वाढवली पाहिजे. दुसरीकडे अपघातासाठी बिघ़डलेले रस्ते हेही एक कारण असू शकते. सार्वजनिक बांधकाम खात्याने हे रस्ते तातडीने दुरुस्त करावेत, असेही सार्दिन म्हणाले.

सरकारने वीज दरवाढ ६ टक्क्यांनी वाढविण्याचा प्रस्ताव पुढे केला आहे, त्याला आपला विरोध आहे. वीज खाते तोट्यात आहे, हे खरे तरी सरकारने लोकांसाठी थोडी कळ सोसावी. वीज गळतीचा शोध घेऊन ती रोखावी. सर्वच क्षेत्रात महागाई वाढली आहे. त्यात वीजदरवाढीचा बोजा लोकांवर टाकू नये, असेही सार्दिन म्हणाले.

रात्रीची ध्वनी मर्यादा ११ पर्यंत करावी, जुने गोवे येथील अनधिकृत बंगला पाडावा व माजोर्डानंतर वास्कोपर्यंत डबल ट्रॅकिंग करू नये, अशी मागणीही केली. ते म्हणाले डबल ट्रॅकिंग संदर्भात आपण केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी बोललो आहे व पंतप्रधानसह इतर संबंधित मंत्र्यांना व अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. हा प्रश्र्न आपण संसदेतही उपस्थित करणार असल्याचे ते म्हणाले.

रेतीव्यवसायाला मुभा द्यावी

गोव्यात रेतीव्यवसायासाठी पूरक अशी स्थिती आहे. मात्र, सरकारने रेती उपशासाठी काही जागा निश्‍चित करून तिथे परवानगी द्यावी, जेणेकरून रेतीचा जो अवैध व्यवसाय सुरू आहे, तो बंद होईल. रेती व चिरे (दगड) खाणीसाठी सरकार कायदेशीररीत्या काहीही उपाय शोधत नाही. तसे केल्यास अधिकारी व राज्यकर्त्यांच्या मिळकतीवर परिणाम होईल, ही भीती त्यांना आहे. रेतीचे दर वाढलेले आहेत व एक चिरा ५६ रुपये एवढे झाला आहे. त्यामुळे घरबांधणी भयंकर महागल्याचे सार्दिन म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT