Margao News Dainik Gomantak
गोवा

Margao Municipality: बेकायदा पार्किंगबाबत ‘रेेंट अ बाईक’वर कारवाई

आरटीओची मोहीम ः परवाना निलंबित करणार

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव नगरपालिका परिसरातील सर्व ठिकाणच्या पार्किंग जागा ‘रेंट अ बाईक’वाल्यांनी हडप केल्याप्रकरणी नगरपालिकेने आरटीओ कार्यालयात तक्रार केली. आरटीओने त्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली असून आज बेकायदा ‘पार्क’ केलेल्या सहा दुचाक्यावर कारवाई केली. सार्वजनिक ठिकाणी ही वाहने पार्क केलेली आढळल्यास त्यांचे परवाने निलंबित करण्यात येणार असल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

याविषयी मडगाव नगरपालिकेत आरटीओ, ट्राफिक वाहतूक अधिकारी, मडगाव व गांधी मार्केट बाजार अध्यक्ष तसेच नगरपालिका नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व पालिकेचे नगरसेवक यांच्यात चर्चा होऊन या प्रकरणी सर्व्हे करून हा प्रश्न निकालात काढण्याविषयी निर्णय घेण्यात आला होता.

नगरसेवक आमोणकर यांनी हा प्रश्न उचलून धरला होता आणि याविरुद्ध अनेकवेळा आवाज उठविला होता. या बैठकीवेळी आरटीओ अधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात आले, की या रेंट अ बाईकवाल्यांना परमिट देते वेळी ही वाहने आपल्या घराकडे किंवा कार्यालयासमोर पार्क करण्याची अट घालण्यात येते.

मात्र ही वाहने सार्वजनिक ठिकाणी पार्क करण्यात येत असल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असून वाहनांचा परवाना निलंबित करण्यात येणार आहे.

पालिकेकडून परवानगी नाही

नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी सांगितले की या ‘रेंट अ बाईक’वाल्याना नगरपालिकेकडून कोणताही परवाना देण्यात आलेला नाही. त्यांच्याकडून या ठिकाणी पार्क करण्यात येत असलेली वाहने इतरांना अडथळ्याची ठरत असल्याचे नगरसेवक महेश आमोणकर यांनी निदर्शनास आणून दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT