Canacona Encroachment Dainik Gomantak
गोवा

Canacona Encroachment : ‘त्या’ 78 घरांवरील कारवाई बंदोबस्ताअभावी तात्पुरती टळली

गेली अनेक वर्षे काबाडकष्ट करून भूमिहीन भूमिपुत्रांनी ही घरे उभारली आहेत. त्या घरांना अभय देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Canacona : आगोंद येथील काणकोण कोमुनिदाद मालकीच्या जमिनीवर उभारलेल्या 78 घरांवरील संकट तात्पुरते टळले आहे. हे अतिक्रमण हटविण्यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त उपलब्ध न झाल्यामुळे ही कारवाई पुढे ढकलण्यात आली आहे.

मंगळवारी (ता.18) या घरांवर कारवाई करण्यात येणार होती. त्यासाठी कोमुनिदाद प्रशासकांनी वेगवेगळ्या पथकांची स्थापना केली होती. काणकोण कोमुनिदादचे मुखत्यार शंभा नाईक देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेकायदा घरे मोडून काढण्यासाठी पोलिस पथकांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र, पोलिस यंत्रणा अन्य कामांत व्यस्त असल्याने ही कारवाई पुढे ढकलण्यात आली.

या 78 घरांपैकी काही घरे पंचवीस वर्षांपूर्वीची आहेत. आगोंद येथील कोमुनिदादच्या जमिनीत बेकायदा उभारलेल्या 78 घरांवर कारवाई करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने सहा महिन्यांपूर्वी दिला होता. कोमुनिदाद प्रशासकांना या निर्णयाची कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे संबंधितांना

नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या. मात्र, गरीब भूमिपुत्रांनी उभारलेल्या या घरांवर सरकारने कारवाई करू नये, अशी मागणी कॉंग्रेस नेते जनार्दन भंडारी यांनी केली होती. गेली अनेक वर्षे काबाडकष्ट करून भूमिहीन भूमिपुत्रांनी ही घरे उभारली आहेत. त्या घरांना अभय देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lashkar e Taiba Commander Encounter: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसा एन्काउंटरमध्ये ढेर! 527 दिवसांचा थरार संपला; भारतीय सैन्याची मोठी कारवाई VIDEO

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा होऊ शकते भारत-पाकिस्तानची टक्कर! वर्ल्ड कप 2027 चं संपूर्ण गणित जाणून घ्या

Canacona Water Crisis: काणकोणमधील बंधारे अद्याप खुलेच; नद्या-नाले कोरडे, पाणीटंचाईचे संकट गडद

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

SCROLL FOR NEXT