Action against an illegal massage parlor in goa Dainik Gomantak
गोवा

हणजूणमधील आणखी एका बेकायदा मसाज पार्लरला टाळे

हणजूण परिसरातील आणखी एक बेकायदा मसाज पार्लरला उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार मंगळवारी टाळे ठोकण्यात आले.

दैनिक गोमन्तक

म्हापसा: हणजूण परिसरातील आणखी एक बेकायदा मसाज पार्लरला उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार मंगळवारी टाळे ठोकण्यात आले. गेल्या आठवड्यात पोलिस उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी हणजूण पोलिसांसोबत कारवाई करीत ‘अलगा सेंटर फॉर आयुर्वेदिक अ‍ॅण्ड हिलिंग’ नामक या बेकायदा मसाज पार्लरवर छापा टाकला होता.

(Action against an illegal massage parlor in goa)

याबाबत हणजूण पोलिसांनी या कथित पार्लर संदर्भात अहवाल सादर केला होता. त्यानुसार, उत्तर गोवा जिल्हाधिकारी आयएएस श्रीमती मामु हागे यांच्या निर्देशानुसार उपजिल्हाधिकारी गुरुदास नाईक यांनी या कथित पार्लरला मंगळवारी टाळे ठोकले. हणजूणमधील हे दुसरे बेकायदा मसाज पार्लर आहे, जे बंद करण्यात आले आहे.

दरम्यान, हल्लीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील बेकायदा मसाज पार्लरवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, उत्तर गोव्यातील किनारी भागांत पोलिसांकडून अशाप्रकारे अनधिकृत मसाज पार्लरवर छापा सत्र सध्या पोलिसांकडून आरंभले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT