Quepem Police Arrested Accused Dainik Gomantak
गोवा

Quepem : पारोडा खून प्रकरणातील आरोपी अवघ्या 48 तासात गजाआड

आरोपीला उत्तर प्रदेशमध्ये अटक

सुशांत कुंकळयेकर

Quepem : पारोडा केपे येथे एका बिहारी कामगाराचा खून करून नंतर उत्तर प्रदेशमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न करणारा संशयित प्रदीप यादव याला केपे पोलीसांनी पाठलाग करून अवघ्या 48 तासात जेरबंद केले.

दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक अभिषेक धानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार मयत कामगाराचे नाव अर्जुन शर्मा (25, बिहार) असे असून 13 मार्च रोजी त्याचा मृतदेह पारोडा येथे आडवाटेवर सापडला होता. त्याच्या डोक्यावर फावड्याने वार केल्याने त्याचे निधन झाले होते. हे सर्व कामगार रस्त्याचे काम करत होते.

या कामगारांमधील संशयीत प्रदीप यादव हा अकस्मात गायब झाल्याने पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला. तांत्रिक उपकरणाद्वारे संशयितांच्या हालचालीचा माग घेतला असता तो उत्तर प्रदेशच्या दिशेने ट्रेनमधून जात असल्याचे पोलिसांना कळून आले.

ही माहिती मिळाल्यावर, उपनिरिक्षक शिवराम गावस यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तातडीने उत्तरप्रदेशला पाठविण्यात आले. पोलीस त्याचा माग काढत काढत उत्तरप्रदेश मधील खुशीनगर येथे पोहोचले, जो संशयिताचा गाव होता. या गावांतील कासिया येथील बस स्टॉपवर त्याला पकडण्यात आले.

मयत अर्जून शर्मा याचा मोबाईल फोन चोरण्याच्या उद्देशाने हा खून केल्याची माहिती धानिया यांनी दिली. धानिया यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक पेडणेकर यांनी उपनिरीक्षक शिवराम गावस, महिला उपनिरिक्षक वेरोनिका कुतीन्हो व इतरांच्या साहाय्याने या प्रकरणाचा यशस्वी तपास लावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Post Monsoon Rain Update: 107 वर्षांतील निचांकी मान्सूननंतर गोव्याला आता परतीच्या पावसाचीही हुलकावणी; मान्सूनोत्तर पाऊस 99 टक्क्यांनी घटला!

Goa Winter Tourism: गोव्यात हिवाळी पर्यटनाची दणक्यात सुरुवात! मॉस्कोहून 285 पर्यटकांसह दुसरे चार्टर विमान दाबोळीत दाखल

Andhra Pradesh Boiler Explosion: आंध्र प्रदेशातील कारखान्यात भीषण स्फोट; नावात साधर्म्य असल्याने गैरसमज, औषध कंपनीने मांडली आपली बाजू

Goa Politics: 'एक कचोरी, दोन समोसा, काँग्रेस आमदारांचा काय भरोसा?'; निवडणुकांआधी 'आप'चा काँग्रेसवर जोरदार घणाघात!

Goa Accident: गुगल मॅपची वाट, कोलवाळात घात! मद्यधुंद स्‍कॉर्पिओचालकाची स्कूटरला धडक; मुंबईतील महिला पर्यटकाचा मृत्यू, पती अन् मुलगी जखमी

SCROLL FOR NEXT