TIger News  Dainik Gomantak
गोवा

केरी पट्टेरी वाघ हत्या प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता

तेरा वर्षांनी पुराव्या अभावी न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता

दैनिक गोमन्तक

वाळपई: 2009 संपुर्ण गोव्यात गाजलेल्या पट्टेरी वाघ हत्या प्रकरणात गुन्हा नोंद असलेल्या संशयीत आरोपींची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता आज सत्तरी प्रथम वर्ग न्यायालयाने केली आहे. त्यामुळे गेली तेरा वर्षे सुरू असलेल्या पट्टेरी वाघ प्रकरणाचा निकाल आज लागला आहे. 2009 साली फेब्रुवारी महिन्यात ही वाघ हत्या झाली होती. त्या प्रकरणात पट्टेरी वाघ हत्या प्रकरणी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ( Accused in Keri tiger case )

या गुन्हांतील संशयित गणेश माजीक, नागेश माजीक, सूर्यकांत माजीक, अंकुश माजीक व भिवा गावस संशयित आरोपींना जामीन मिळाला होता. मिळालेल्या माहितीनूसार 2009 साली गावातील काही जणांनी रानटी प्राण्यांची शिकार करण्यासाठी सापळा लावला होता. त्या सापळ्यात पट्टेरी वाघ सापडला व तो वाघ पंधरा दिवस तसाच राहिला. व वाघ सापळा घेऊनच फिरत होता.

ज्या लोकांनी सापळा लावला होता ते लोक जेव्हा त्या जागेवर पोहोचले तेव्हा त्यांना पट्टेरी वाघ दिसला. त्या वेळी त्या वाघांची हत्या केली. ही गोष्ट उघडकीस आल्यानंतर एका इंग्रजी दैनिकात बातमी प्रसिद्ध झाली व खळबळ माजून गेली होती. हे प्रकरण राष्ट्रीय पातळीवर गेल्यावर केंद्रीय वनखात्याच्या मार्फत चौकशी सुरू झाली.

या प्रकरणी संशयितांवर गुन्हा नोंद करून त्यांना ताब्यात घेतले होते. यांना जामीन मंजूर झाला होता व आज तेरा वर्षांनी त्यांना पुराव्या अभावी न्यायालयाने निर्दोष सोडण्यात आले आहेत. याबाबत पर्यावरण प्रेमी राजेंद्र केरकर म्हणाले ही वाघ हत्या टळली असती. पट्टेरी वाघ सापळा घेऊन फिरत असल्याची माहीती जर लोकांनी वनखात्याला दिली असती. तर वेळेत हालचाली होऊन वाघाला सापळ्यातून मुक्तता करीत वाचविता आले असते. पण काहींनी तसे न करता वाघाला बंदुकीने ठार मारले गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT