Murder Case|Curchorem Police  Dainik Gomantak
गोवा

रूपा पारकर हत्येप्रकरणी कुडचडे पोलिसांकडून आरोपीला अटक

ही हत्या चोरीसाठी की अन्य कारणासाठी याचा शोध सुरू

दैनिक गोमन्तक

केपे : करमणे सावर्डे येथील रूपा पारकर (55) या महिलेचा खून प्रकरणी कुडचडे पोलिसांना नऊ दिवसांनी यश आले याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. हा खुनी काकोडा भागातील असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र पोलिसांनी त्याचे नाव अजून जाहीर केलेले नाही. हा खून होऊन बरेच दिवस झाल्याने लोकांमध्ये उलट सुलट चर्चेला उत आला होता. (Accused arrested by Curchorem police in Rupa Parkar murder case)

6 मे रोजी रूपा हिचा मृतदेह गुड्डेमळ सावर्डे येथील मुख्य रस्त्याच्या बाजूला जंगलात रस्त्यावर आढळून आला होता. मृतदेहाची ओळख दुसऱ्या दिवशी पटली होती पण रूपा हिचा खून कुणी व का केला हा प्रश्न अद्याप अनुत्तरीच आहे.

कुडचडे पोलिसांनी या खुनाचा छडा लावण्यासाठी सर्व प्रयत्न पणाला लावले होते व यासाठी खास चार शोध पथके तयार केली होती. खुन्याचा तपास लागत नसल्याने वरिष्ठ पोलिसही कुडचडे पोलीस स्थानकावर ठाण मांडून बसत होते.

कुडचडे पोलिसांनी या खुनाचा तपास लावण्यासाठी बऱ्याच लोकांच्या जबान्या सुद्धा पोलिसांनी घेतल्या होत्या. याप्रकरणी फॉरेन्सिक तुकडीने मृतदेह मिळालेल्या ठिकाणची व रूपा यांच्या घरी जाऊन तपासणी केली होती. रूपा हिच्या मृतदेहावर काही प्रमाणात दागिने होते ते पोलिसांना सापडले आहेत पण तिच्या अंगावर सोन्याचा हार होता. तो मात्र, पोलिसांना सापडला नसल्याने खून चोरीसाठी केला की अन्य कारणासाठी याचा शोध पोलीस घेत होते. खून प्रकरणी तपास लावण्यास पोलिसांना यश आले असल्याने लोकांनीही सुटकेचा श्वास सोडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT