Goa Accidental Death: राज्यातील अपघातांचे प्रमाण काही केल्याने कमी होण्याचे नाव घेत नाही. काल रात्री गिरी, बार्देश येथे एका अपघातात 53 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
माहितीनुसार, गिरी येथे राहणारे 53 वर्षीय अनिल कांता सिंग हे गिरी, बार्देश येथे राष्ट्रीय महामार्ग ओलांडत होते. त्यावेळी त्यांना टाटा नेक्सोन कारची धडक बसली. करचालक रमेश प्रेमचंद बरड (35, आगशी, तिसवाडी) हे बेदरकारपणे कार चालवत होते. परिणामी त्यांनी रस्ता ओलंडणाऱ्या अनिल यांना न पाहता त्यांना धडक दिली.
या अपघातात अनिल सिंग यांना अनेक जखमा झाल्या होत्या. यामध्ये त्यांच्या पोटात गंभीर जखम झाली असून त्यांचा एक पायही मोडला असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी त्यांना म्हापसा रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. अनिल सिंग हे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होते.
याप्रकरणी कारचालक रमेश प्रेमचंद बरड यांच्यावर म्हापसा पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दुसरीकडे, बेतकी येथील अपघातात आई आणि मुलाच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. बेतकी येथील आनकल्लेवाडा (कुलकर्णीवाडा) भागातील पत्र्याच्या शेडवर किंदळाचे झाड कोसळल्याने त्याखाली सापडलेल्या माय-लेकाचा दुर्दैवी अंत झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.