Accident 

 

Dainik Gomantak 

गोवा

शांतीनगर येथे राष्ट्रीय महामार्गावर दोन गाड्यांची धडक

या अपघातात (Accident) पलटी मारलेल्या कारमधील चालक सहीसलामत बचावला.

दैनिक गोमन्तक

वास्को: शांतीनगर (Shanti Nagar) येथे राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव वेगाने जाणाऱ्या चार चाकी वाहनाने दुसर्‍या चारचाकी वाहनाला धडक दिली. परिणामी धडक बसलेली गाडी दुभाजकावर कलंडली. दैव बलवत्तर म्हणून वाहनातील चालक सुखरूप बचावला.

आज दुपारी पावणे तीनच्या दरम्यान मांगूरहील ते दाबोळीच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर जीए 03 एन 1160 या चारचाकी वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली असता स्विफ्ट डिझायर गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर टूरिस्ट इनोव्हा गाडीचा पाठीमागचा टायर फुटला. तसेच कारचे (Car) काही प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात (Accident) पलटी मारलेल्या कारमधील चालक सहीसलामत बचावला व किरकोळ जखमेवर निभावले.

स्थानिकांनी तसेच रस्त्यावरुन (Road) जाणाऱ्या वाहनचालकांनी धाव घेऊन उलटलेल्या गाडीत अडकलेल्या चालकाला गाडीतून बाहेर काढले. सदर स्विफ्ट डिझायर कार भरवेगात असल्याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT