फोंडा: उसगावमध्ये प्रसिद्ध असलेल्या नेस्ले कंपनीजवळ एक भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीला कंटेनरने धडक दिल्याने दुचाकीवर मागे बसलेला तरुण (युवराज हनुमंत पाटील 19, उसगाव) गंभीर जखमी झाला, दरम्यान दुचाकीलीचालक (वंश उमेश नाईक 20, भोमा ) मात्र यामधून सुखरूप बचावला आहे. दुचाकी आणि कंटेनर यांच्यात झालेल्या अपघातानंतर दुचाकी थेट एमआरआफ कंपनी समोरील रस्त्यावर जाऊन कोसळली होती.
समोर आलेल्या माहितीनुसार जीए 05 व्ही 5632 ही दुचाकी नेस्ले कंपनीच्या गेट समोरून जात होती. रविवारी( दि. 17 नोव्हेंबर) रोजी रात्रीच्यावेळी 12:30 च्या दरम्यान फोंड्यातून येणाऱ्या आणि मोल्याच्या दिशेने जाणाऱ्या एका आरजे11 जीसी 8821 या कंटेनर सोबत दुचाकीची टक्कर झाली.
ही टक्कर प्रचंड जबरदस्त असल्याने त्यावेळी दुचाकीवर स्वर असलेले युवक कोसळून खाली पडले, दरम्यान दुचाकी मात्र कंटेनरला अडकलेलीच होती.
कंटेनरसोबत ही दुचाकी जवळपास 800 किमी दूर गेली आणि एमआरएफ कंपनी जवळ रस्त्यावर पडली. सध्या या अपघातात जखमी झालेल्या युवकावर उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. या अपघाताचा तपास पोलीस निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रघुनाथ गावस यांनी केला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.