Bicholim Bypass Accident Dainik Gomantak
गोवा

Bicholim Bypass Accident: पुन्हा अपघात! दोन वासरांसह चार गुरांचा बळी

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली, ता. ४ (प्रतिनिधी)ः जून महिन्यात लोकार्पण केलेल्या डिचोलीतील चौपदरी बगलमार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. या बगलमार्गावर अज्ञात वाहनाने चिरडल्याने दोन वासरांसह चार गुरांचा बळी गेला. व्हाळशी जंक्शनजवळ काल रात्री हा अपघात घडला. अपघातानंतर अज्ञात वाहनचालकाने अपघात स्थळावरून वाहनासह पलायन केले.

या अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तसेच पोलिस अपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी रस्त्यावर तडफडून मेलेल्या गुरांना बाजूला केले, तर डिचोली नगरपालिकेने आज सकाळी जेसीबी यंत्राच्या मदतीने मृत गुरांची विल्हेवाट लावली. यावेळी नगराध्यक्ष कुंदन फळारी उपस्थित होते. आत्तापर्यंत पाच गुरांचे बळी

डिचोली बगलमार्गाचे ६ जून रोजी लोकार्पण केल्यानंतर आत्तापर्यंत या बगलमार्गावर लहानसहान मिळून किमान दहा अपघात घडले आहेत. कालची चार मिळून आत्तापर्यंत या बगलमार्गावर पाच गुरांचे बळी गेले आहेत. गेल्या २३ जून रोजी रात्री या बगलमार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका म्हशीचा पहिला बळी गेला होता. त्यानंतर काल रात्री एकाचवेळी चार गुरे दगावली आहेत.

बगलमार्ग वाहतुकीस धोकादायक

या बगलमार्गावर मोकाट गुरांचा संचार वाढला आहे. वाठादेव आणि व्हाळशी जंक्शनसह बगलमार्गावर गुरांचा वावर वाढला आहे. रात्रीच्यावेळी तर ही गुरे सदैव बगलमार्गावर ठाण मांडून असतात. त्यामुळे हा बगलमार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. चौपदरी बगलमार्ग असल्यामुळे वाहनेही वेगात असतात. ठाण मांडून बसणाऱ्या गुरांचा अंदाज येत नसल्याने वाहनचालकांना अक्षरशः कसरत करावी लागते. निष्पाप गुरांचे बळी जातात. या गुरांमुळे एखाद्यावेळी भयानक अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेतकऱ्यांनी आपल्या गुरांची काळजी घ्यावी. त्यांना रस्त्यावर सोडून अपघातांना आमंत्रण देवू नये. गुरांचे पालनपोषण करायला जमत नसेल, तर पालिकेशी संपर्क साधावा. या गुरांची गोशाळेत रवानगी करण्यात येईल.
विजयकुमार नाटेकर, नगरसेवक, डिचोली

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St Estevam Accident: 'सांतइस्तेव प्रकरण' पोहोचणार मंत्रालयात? नातेवाईकांचे देवालाही साकडे

Bhutani Infra: ‘मेगा प्रोजेक्ट’ चे अधिकार आता मुख्यमंत्र्यांकडे; 'भूतानी’ला भाजप सरकारचीच परवानगी असा काँग्रेसचा दावा

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

SCROLL FOR NEXT