Accident near bambolim Dainik Gomantak
गोवा

ख्रिसमसदिवशीच त्याच्यासाठी धावून आला 'देवदूत'! बांबोळीत अपघातग्रस्त युवकाला CPR मुळे मिळाले जीवदान...

चालक भरधाव वेगात गाडी चालवत असल्यामुळे हा अपघात घडला

Kavya Powar

ख्रिसमस पार्टीवरून परतत असताना बांबोळी रस्त्यावर एका स्कूटरचा अपघात घडला आहे. यामध्ये स्कूटीवरील दोन तरुण जखमी झाल्याचे सांगण्यात येते. घटनास्थळावरील प्रथमदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, चालक भरधाव वेगात गाडी चालवत असल्यामुळे हा अपघात घडला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, अपघातावेळी दोघेही साधारण 100 मीटरपर्यंत फरफटत गेले. यावेळी स्कूटीवरील दोघे तरुण जखमी झाले असून त्यातील एका तरुणाची शुद्ध हरपली. दरम्यान, त्यातील एकाने प्रतिसाद देणे बंद केले.

त्यावेळी तिथून जात असलेल्या विजय रेडकर यांनी पुढाकार घेत सदर तरुणाच्या छातीवर दाब (सीपीआर) दिल्यामुळे तो तरुण पुन्हा शुद्धीवर आला.

कुणीच मदतीला आले नाही...

जखमी झालेले दोघेही वेदनेमध्ये असलेले दिसूनही रस्त्यावरील येणारे-जाणारे anekअनेक लोक थांबले नाहीत. हे निदर्शनास येताच विजय रेडकरने आपली गाडी थांबली आणि शुद्ध हरपलेल्या तरुणाला मदत केली. शुद्धीवर आल्यावर त्या तरुणाने विजयचे आभार मानले. विजयच्या मदतीमुळेच आपल्याला नवीन जीवन मिळाले असल्याचे मत जखमी तरुणाने व्यक्त केले.

ख्रिसमस-नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन काळात अपघातात वाढ....

ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा लोंढा गोव्यात दाखल होत असतो. यामध्ये स्थानिकही सहभागी असतात. पार्टीमध्ये मद्यप्राशन करून वाहने चालवण्याचे प्रमाणही वाढले असून यामुळेच राज्यात अपघात घडत आहेत. त्यामुळे चालकांनी वाहतुकीचे नियम पाळवेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: युतीच्या चर्चेला मुहूर्त, विजय-गिरीश यांची मडगावात भेट; जागावाटपावर मात्र 'ब्र'ही नाही

Peru Tourist Plane Crash: पेरूमध्ये भीषण दुर्घटना! पर्यटकांना घेऊन जाणारं विमान कोसळलं; पायलटसह 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू VIDEO

Horoscope: संकष्टी चतुर्थीला गणरायाची विशेष कृपा! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, समृद्धी, नोकरीची संधी आणि धनवर्षाव

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

SCROLL FOR NEXT