Accident Death In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Death: पेडे-म्हापसा येथे सहा वाहनांमध्ये विचित्र अपघात

Goa Accident Death: म्हापसा येथील राष्ट्रीय महामार्गावरील पेडे जंक्शनवर सहा वाहनांमध्ये विचित्र अपघात झाल्याची घटना रविवारी दुपारी 1 वाजता घडली.

Shreya Dewalkar

Goa Accident Death: म्हापसा येथील राष्ट्रीय महामार्गावरील पेडे जंक्शनवर सहा वाहनांमध्ये विचित्र अपघात झाल्याची घटना रविवारी दुपारी 1 वाजता घडली. या अपघाताामुळे मार्गावरील वाहतूक बराच वेळ खोळंबली होती.

अपघातात तीन ट्रक व तीन दुचाकींचा समावेश होता. या अपघातात पाचजण किरकोळ जखमी झाले. पेडे जंक्शन येथे आज दुपारी करासवाडाहून पणजीच्या दिशेने मालवाहू ट्रक (एमएच ४६ बीएम १२५१) जात होता, त्याचवेळी जंक्शनवर पाण्याचा टँकर (जीए ०३ डब्ल्यू १२०२) वळण घेत होता. यादरम्यान त्यास या मालवाहू ट्रकने ठोकर दिली.

त्यामुळे ही दोन्ही वाहने रस्त्याच्या विरुद्ध दिशेने असलेल्या तिसऱ्या मालवाहू (जीए ०८ व्ही ७५०७) वाहनांवर जाऊन स्थिरावली आणि याच मालवाहूला पाठीमागून एका दुचाकीने ठोकर दिली. यात जंक्शनवर असलेल्या दोन दुचाकी या ट्रकखाली सापडल्या. या दोन्ही दुचाकींवरील चालक किरकोळ जखमी झाले.

पाचजण जखमी

ईअन फर्नांडिस (३४, पेडे), मोहनलाल कामी (३८, करासवाडा), मनिष कामी (११, करासवाडा), प्रवीण सातार्डेकर (४४, म्हापसा) व उर्वी सातार्डेकर (३२, म्हापसा) हे पाचजण किरकोळ जखमी झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT