Panjim Car Accident  Dainik Gomantak
गोवा

Panjim Accident : ताळगावात भरधाव कारची बेवारस गायीला धडक

पणजीतील अपघातात कारचालक गंभीर जखमी; कारचंही मोठं नुकसान

आदित्य जोशी

Panjim Accident : पणजीजवळच असलेल्या ताळगावात आज सकाळी एक विचित्र अपघात पाहायला मिळाला. विद्यापीठ रोडवर सोमवारी पहाटे 3.30 ते 4 वाजण्याच्या दरम्यान एका भटक्या गायीला कारने धडक दिल्याने कारचालक किरकोळ जखमी झाला. या अपघातात कारचंही नुकसान झालं आहे.

पणजी शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ८ वाजता पोलिसांना अपघाताचा वायरलेस संदेश मिळाला. त्यानंतर तातडीने पोलिसांचं एक पथक घटनास्थळी दाखल झालं. अपघातामध्ये कारच्या विंडशील्डचा चक्काचूर झाला असून पुढील भागाचे पूर्ण नुकसान झाले आहे. वाहनाच्या धडकेने गंभीर जखमी झालेली गाय मये येथील गोशाळेत हलविण्यापूर्वी बराच वेळ अपघात झालेल्या ठिकाणी एकाच जागेवर पडून होती.

पणजी शहर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर आमोणकर यांनी या अपघाताबाबत माहिती दिली आहे. अपघातग्रस्त कारच्या चालकाचं नाव फेलिक्स डिसोझा असं असून तो किरकोळ जखमी होऊन बालंबाल बचावला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अपघाताच्या वेळी डिसूझा यांनी सीट बेल्ट घातला असल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा ते कारमधून बाहेर फेकले गेले असते, अशी भीतीही आमोणकर यांनी व्यक्त केली. याठिकाणी शेजारी राहणाऱ्या काही मजुरांच्या म्हणण्यानुसार, चालकाच्या नकळत भरधाव वेगाने येणाऱ्या कारसमोर अचानक गाय आल्याने अपघात झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT