Goa Accident Case Dainik Gomantak
गोवा

Accident Cases In South Goa : दक्षिण गोव्यात अपघातांतील मृत्यूंमध्ये होतेय झपाट्याने वाढ

गोमन्तक डिजिटल टीम

Accident Cases In South Goa : २०२३ हे वर्ष दक्षिण गोव्यासाठी अपघात व त्यामुळे होणाऱ्या मुत्यू प्रकरणांमुळे अपशकुनी ठरत आहे. गत सहा महिन्यांत ७०३ अपघात व ९८ मृत्यूंची नोंद झाली आहे.गेल्या पाच वर्षांत दक्षिण गोव्यात एकूण ८५९९ अपघात होऊन त्यात ७५१ जण मृत्युमुखी पडल्याची नोंद पोलिस स्थानकांत आहे.

हे अपघात वाहतूक नियमांचा भंग केल्याकारणाने होत असतात, असे पोलिसांचे मत आहे. वेर्णा येथे जास्त अपघात होतात याची कारणमिमांसा करताना वेर्णा पोलिस निरीक्षक डायगो ग्रेसियस सांगतात की, वेर्णा जंक्शनवरून दाबोळी विमानतळ, औद्योगिक वासाहतीत जाण्याचा मार्ग असल्याने येथे २४ तास रहदारी असते.

शिवाय पणजी-मडगाव, मडगाव-वास्कोला जाणारी वाहने येथूनच जातात. तशाचत चालक घाईगडबडीत, वाहतूक नियमांचा भंग करून वाहने चालवत असतात. त्यामुळे अपघातांमध्ये वाढ होत आहे.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांना सरकारकडून सानुग्रह अनुदान दिले जाते. २०२० पासून अशा ११८ कुटुंबांना २.३४ कोटी रुपये सरकारतर्फे सानुग्रह अनुदान वितरित केल्याची माहिती मिळाली आहे.

वेर्णा औद्योगिक वसाहत परिसर अग्रेसर

मडगाव पोलिस स्थानकाच्या हद्दीत ४० अपघात व ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

कुडतरीत सर्वाधिक १०५ अपघात व १० मृत्युमुखी पडले आहेत.

फातोर्डात २६ अपघात होऊन ४ जणांचा मृत्यू झाला.

सर्वाधिक १३३ अपघात वेर्णा औद्योगिक वसाहत परिसरात झाले असून १७ जण मृत्युमुखी पडले आहेत.

शिवाय कोलवा, कुंकळ्ळी, केपे, कुडचडे, काणकोण, सांगे, वास्को, मुरगाव, दाबोळी, फोंडा, म्हार्दोळ, कुळे या भागांतही अपघातांची संख्या वाढतच आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT