Goa Accident News Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Cases: राज्यात अपघातांची मालिका सुरूच! थिवी, धारगळ अन् मालपेत अपघातांची नोंद

सकाळपासून तीन अपघातांची नोंद झाली आहे

Kavya Powar

Goa Accident News: राज्यात अपघातांची मालिका काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. आज (शुक्रवार) सकाळी थिवी येथे एका अपघाताची नोंद झाली आहे. गाडी चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कर्नाटक नोंदणीकृत भाजीवाहू टेम्पो कांसाबोर्ड थिवी येथे उरतीवर रस्त्याबाजूला गेला.

सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसून, कोलवाळ पोलिसांच्या मदतीने रस्त्यावर पडलेला भाजीपाला दुसऱ्या गाडीत भरण्यात आला. सदर घटना आज पहाटे घडली आहे.

तर दुसरीकडे, धारगळ येथेही अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. धारगळमधील दोन खांब येथे दोन चारचाकींमध्ये जोरदार धडक बसली. मात्र यामध्ये कुणालाही इजा झाली नाही.

तर तिसऱ्या घटनेत एका कारचा स्वयं अपघात झाला आहे. मालपे येथील रस्त्यावर ही घटना घडली. भरधाव वेगात असलेली कार रस्त्याकडेला जाऊन आदळली. यामध्ये कारच्या पुढील बाजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

माहितीनुसार, सदर कार महाराष्ट्रातील असून, यामध्ये चौघेजण प्रवास करत होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी चालकाला आणि इतर प्रवाशांना बाहेर काढले. जुन्या रस्त्यावरून तोल जाऊन कार 15 मीटरवरून खालच्या नव्या रस्त्यावर कोसळली. यामध्ये चौघेजणही गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना पहाटे 3.40 च्या सुमारास घडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT