Accident in Curtorim  Dainik Gomantak
गोवा

कुडतरीत गाडीची धडक बसल्याने रुग्णवाहिकेने घेतला पेट

सुदैवाने जीवितहानी नाही; रुग्णवाहिकेतील रुग्णाला लगेच बाहेर काढल्याने अनर्थ टळला

दैनिक गोमन्तक

मडगाव : दक्षिण गोव्यात आज एक भीषण अपघात पाहायला मिळाला आहे. कुडतरी येथे रुग्णवाहिका आणि स्कोडा कार यांची समोरासमोर धडक बसून भीषण अपघात झाला आहे. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर रुग्णवाहिकेने अचानक पेट घेतला. (Accident between Skoda and Ambulance in Curtorim News Updates)

अपघातग्रस्त रुग्णवाहिका कुडचडे आरोग्य केंद्राच्या रुग्णालयाशी संलग्न होती आणि एका रुग्णाला ती मडगावला घेऊन जात होती. या अपघातानंतर वाहनांचा धक्का जवळच्या असलेल्या वीज खांबाला बसून विजेची ठिणगी रुग्णवाहिकेवर पडली. त्यामुळे रुग्णवाहिकेने पेट घेतला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. अपघातात सापडलेली दोन्ही वाहने वेगात होती अशी माहिती तेथील प्रत्यक्षदर्शीनी दिली.

या रुग्णवाहिकेत एका रुग्णासह परिचारिका आणि रुग्णाचा नातेवाईक होता. त्या सर्वांना बाहेर काढल्यावर रुग्ण वाहिकेने पेट घेतल्याने सुदैवाने अनर्थ टळला आहे. मात्र या अपघातात ती परिचारिका किरकोळ जखमी झाली. या घटनेची माहिती मिळाल्यावर स्थानिक आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स तिथे त्वरित हजर झाले. त्यानंतर लगेच दुसरी रुग्णवाहिका बोलावून घेऊन त्या रुग्णाला हॉस्पिसियो इस्पितळात हलविण्यात आले. स्कोडा गाडीच्या चालकलाही किरकोळ मार बसल्याचे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT