Valshi Junction Accident Dainik Gomantak
गोवा

Bicholim Accident: डिचोली-अस्नोडा रस्त्यावर बसची कारला धडक; आलिशान कारचे नुकसान

Bicholim Assonora Road Accident: खासगी प्रवासी बस आणि आलिशान मोटारगाडी यांच्यात झालेल्या भयानक अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली

गोमन्तक डिजिटल टीम

Valshi Junction Accident

डिचोली: डिचोली-अस्नोडा मुख्य रस्त्यावर खासगी प्रवासी बस आणि आलिशान मोटारगाडी यांच्यात झालेल्या भयानक अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र या अपघातात प्रवासी बसमधील एक युवती किरकोळ जखमी झाली.

हा अपघात आज (मंगळवारी) सकाळी व्हाळशी जंक्शनजवळ घडला. यासंबंधी उपलब्ध माहिती अशी की, आलिशान मोटारगाडी उजव्या बाजूने दुसऱ्या लेनमध्ये घेताना मागाहून वाळपईहून पणजीला जाणाऱ्या खासगी प्रवासी बसने कारला जोरदार धडक दिली. या धडकेबरोबर कार फरफटत पुढे गेली. तर बसमधील एक युवती पुढील सीटला आपटल्याने ती किरकोळ जखमी झाली.

अपघातग्रस्त आलिशान कार एक महिला चालवत होती. या अपघातात त्या सुखरूप बचावल्या. अशी माहिती मिळाली आहे. या अपघातात कारची मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली. क्रेनच्या साहाय्याने कार रस्त्यावरुन बाजूला करण्यात आली. हा अपघात आपापसात मिटवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT