Abu Farhan Azmi Dainik Gomantak
गोवा

Abu Farhan Azmi: 'मी बंदूक दाखवलीच नाही, जमावाने मला व माझ्या मुलाला घेरलं'; अबू आझमींच्या मुलाने सांगितलं गोव्यात नेमकं काय घडलं?

Abu Farhan Azmi: आमदार अबू आझमी यांच्या पुत्राने कळंगुटमध्ये जमावाला बंदूकीचा धाक दाखवल्याचा आरोप स्थानिकांनी केला.

Pramod Yadav

कांदोळी: कारने वळण घेताना इंडिकेटर दाखवला नाही, यावरुन झालेला वाद विकोपाला गेला आणि याप्रकरणात महाराष्ट्रातील आमदार अबू आझमी यांच्या पुत्रासह आणखी तीन जणांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. कळंगुट पोलिसांनी याप्रकरणी सर्वांना नोटीस देखील बजावली आहे. अबू आझमी यांच्या मुलाने गोव्यात त्याच्यासोबत नेमकं काय घडलं? याबाबत माहिती दिली आहे.

न्यूटन मार्केट परिसरात रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. अबू फरहान आझमी आणि त्यांचा मुलगा त्यांच्या कारमधून मार्केटच्या दिशेने जात असताना पिता-पूत्र दुचाकीवरुन घरी जात होते. दरम्यान, आझमी यांच्या कारने इंडिकेटर दाखवला नाही यावरुन दोघांमध्ये मोठा वाद झाला. या वादातून मोठा जमाव घटनास्थळी गोळा झाला. यावेळी आझमी यांनी बंदूकीचा धाक दाखवल्याचा आरोप स्थानिकांनी केला. पण, बंदूक माझ्या बॅगेत होती पण मी ती दाखवलीच नाही, असे स्पष्टीकरण फरहान आझमी यांनी दिले आहे.

फरहान यांनी गोव्यात घडलेल्या प्रसंगाचे वर्णन करताना, "वळण घेताना कारचा इंडिकेटर देखील दाखवण्यात आला होता. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज तपासता येईल, असे सांगितले. महाराष्ट्रातील असल्याचा कारणावरुन तसेच, मोठी कार असल्याच्या कारणावरुन जमावाने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. परिस्थिती हाताबाहेर गेली असता मी पोलिसांना मदतीसाठी फोन केला. पण, पोलिसांनी घटनास्थळी येण्यास विलंब केला", असा आरोप आझमी यांनी केला आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

"पोलिसांनी घटनास्थळी घेऊन मलाच पोलिस व्हॅनमध्ये बसवून पोलिस स्थानकात नेले. पोलिस व्हॅनमधून मला बाहेर खेचण्याचा प्रयत्न जमावाने केला. तसेच, मुलावर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न जमावाने केला", असा आरोप फरहान यांनी केला आहे.

"त्या ४२ मिनिटात जमावाने मलाच पोलिस व्हॅनमध्ये बसण्यासाठी दबाव निर्माण केला. मी तक्रारदार होतो आणि मीच पहिल्यांदा पोलिसांना फोन केला होता. पण, मुलाच्या सुरक्षेसाठी मी व्हॅनमध्ये बसलो", असे आझमी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, कळंगुट पोलिसांनी आमदार अबू आझमी यांचे पूत्र फरहान आझमी यांच्यासह आणखी तीन जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी सर्वांना नोटीस बजवाली असून, याप्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. यापूर्वी फरहान आझमी यांची पत्नी बॉलीवूड अभिनेत्री आयेशा टाकियाने देखील पतीसाठी मैदानात उतरत गोव्यात महाराष्ट्र द्वेष टोकाला गेल्याचे दिसून येतंय, आमच्याकडे पुरावे आहेत, असे आयेशाने म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BA LLB Entrance Exam: 'गोमंतक' इम्पॅक्ट! बीए एलएलबी गुणवाढ प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल, मागवला सविस्तर अहवाल; शिक्षण सचिवांना निर्देश

Goa Fake Call Center Raid: गोव्यातून अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! दोन बनावट कॉल सेंटर्सवर छापेमारी; 19 जणांना बेड्या

Mandovi River Casino: मांडवीत नवा कॅसिनो येणार की रोखला जाणार? सरकार आणि कंपनीच्या दाव्यांमधील विसंगती न्यायालयासमोर उघड; भूमिकेवरच सवाल

Karnataka Goa Island Dispute: गोव्‍याच्‍या ताब्‍यातील 16 बेटांवर कर्नाटकचा दावा! केंद्राला पत्र, सीमावाद पेटणार

Horoscope 30 April 2026: अक्षय्य तृतीयेचा सुवर्णयोग! 'या' राशींंचं पालटणार नशीब, गुंतवणुकीतून मिळणार चांगला परतावा; मेहनतीला यशाची सुवर्ण जोड

SCROLL FOR NEXT