Organizing awareness programs Dainik Gomantak
गोवा

तंबाखू सेवनामुळे दरवर्षी देशात आठ लाख संसार होतात उद्ध्वस्त : डॉ. नाईक

वाळपईत जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त जागृती

दैनिक गोमन्तक डिजिटल

तंबाखू सेवनाने होणाऱ्या आजारांमुळे दरवर्षी देशात सुमारे आठ लाख लोकांचा मृत्यू होतो. तंबाखूच्या सेवनामुळे हृदयरोग, पक्षाघात, कर्करोग, मधुमेह होतो. त्यामुळे दिवसेंदिवस तंबाखूमुळे वाढणारे मृत्यूंचे प्रमाण चिंताजनक आहे. त्यामुळे समाजात जनजागृती करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन वाळपई सामाजिक आरोग्य खात्याचे अधिकारी डाॅ. विकास नाईक यांनी केले.

31 मे रोजी होणाऱ्या जागतिक तंबाखूविरोधी दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी वाळपई पालिका कर्मचारी आणि कामगारांसाठी जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वाळपई शासकीय आरोग्य खात्याचे अधिकारी डाॅ. विकास नाईक, पार्सेकर, नगरसेवक विनोद मणेरकर आणि मान्यवर उपस्थित होते.

आरोग्य खात्याचे कर्मचारी पार्सेकर यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. यावेळी उपस्थितांना ‘पीपीडी’तर्फे सविस्तर माहिती देण्यात आली. उपस्थितांचे आभार रेवती यांनी मानले.

धोकादायक रसायने घेतात जीव

सिगारेट आणि इतर प्रकारच्या तंबाखू उत्पादनांमध्ये किमान ७० धोकादायक रसायने आढळतात. या रसायनांच्या संपर्कात आल्याने तोंडाचा कर्करोग होतो. त्यामुळे तोंडाच्या आतील भागात वेदना होणे, ओठ दुखणे, गिळण्यास असमर्थता, बरे न होणारे व्रण, व्रणातून रक्त येणे, मानेवर सूज येणे, आवाजात बदल होणे, गिळण्यास अडचण यासारखी लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

इतर घटकही कारणीभूत

तोंडाच्या कर्करोगाचे इतर जोखीम घटक म्हणजे मौखिक अस्वच्छता, दातांची जळजळ, ह्युमन पॅपिलोमा व्हायरल इन्फेक्शन, मधुमेह आणि इम्युनोसप्रेसिव्ह औषधांचा मोठ्या प्रमाणात वापर. आज-काल २० ते ३० वयोगटातील तरुण तोंडाच्या कर्करोगाने ग्रस्त आहेत, अशी माहिती डॉ. नाईक यांनी दिली.

कर्करोगाची लक्षणे

तोंडाचा कर्करोग म्हणजे तोंडातील ऊतींची असामान्य वाढ होणे. तो तोंडापासून नाक, मानेच्या भागात आणि शरीराच्या इतर भागांतही पसरू शकतो. प्रारंभी तोंडात पांढरे किंवा लाल ठिपके पडणे, जीभ, ओठ किंवा तोंडावर फोड येणे, तोंडातून रक्त येणे, तोंडाला सूज येणे, गिळण्यास त्रास होणे ही लक्षणे अाहेत.

ही व्यसने टाळा!

गुटखा, जर्दा, मावा, खर्रा, खैनी, सिगारेट, बिडी आणि हुक्का यात तंबाखूचा वापर हे ट्यूमर होण्याचे प्रमुख कारण आहे. धूम्रपानाच्या रूपात तंबाखूचे सेवन केल्याने तुमच्या एकंदर आरोग्यावर परिणाम होतो आणि तुमचे जीवनमान कमी होते. सिगारेट, सिगार पाईप, तंबाखू, च्यूइंग तंबाखू आणि स्नफसह सर्व तंबाखू उत्पादनांमध्ये असलेले निकोटीन हे मानवी शरीरास अत्यंत घातक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: रविवारी रंगणार भारत–पाकिस्तान महामुकाबला! किती वाजता सुरू होणार? कुठे पाहता येणार? जाणून घ्या A टू Z माहिती

Goa Crime: गोव्यात दिवसा चेन स्नॅचिंग… रात्री महाराष्ट्रात पसार! इराणी गँगचा पर्दाफाश, दोघांना अटक

Snake vs Mongoose: 'कट्टर शत्रू' समोरासमोर! भर रस्त्यात मुंगूस-नागाच्या लढाईचा थरार, पाहा पुढे काय झालं...Video Viral

राज्यपालपदाच्या प्रवासासाठी राजकीय प्रवासाला सोडचिठ्ठी; पी. अशोक गजपती राजू यांचा तेलगू देसम पक्षाचा राजीनामा

'It's Family Matter', आमदार कार्लुस फेरेरा यांच्या तक्रारीबाबत बोलण्यास खासदार विरियातो यांचा नकार Video

SCROLL FOR NEXT