Goa AAP Dainik Gomantak
गोवा

Goa AAP: ‘आप’तर्फे राज्यात ‘महिला सुरक्षा संवाद मोहीम’; महिलांवरील अत्याचाराला वाचा फोडणार

Womens Safety Campaign: या मोहिमेचा उद्देश महिलांना सक्षम बनवणे आणि राज्यात सुरक्षित वातावरण निर्माण करणे हा आहे

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: ‘आप’चे बाणावलीचे आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी शनिवारी महिलांवरील वाढत्या अत्याचारांबाबत जागृती करण्यासाठी राज्याच्या चाळीसही मतदारसंघांमध्ये ‘राज्यव्यापी महिला सुरक्षा संवाद मोहीम’ सुरू करण्याची घोषणा केली. ‘आप’ महिला विभागाच्या नेतृत्वाखालील आणि व्हिएगस यांनी समन्वयित केलेल्या या मोहिमेचा उद्देश महिलांना सक्षम बनवणे आणि राज्यात सुरक्षित वातावरण निर्माण करणे हा आहे.

सोमवार, १९ रोजी बाणावलीमधून मोहिमेला सुरवात होईल. त्यानंतर २० रोजी वेळ्ळी मतदारसंघात महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नांना संबोधित करून या मतदारसंघात संवाद वाढवण्यासाठी आघाडी पक्ष आणि विरोधी आमदारांसोबत समन्वय साधला जाईल, असे व्हिएगस यांनी सांगितले.

राज्यातील महिलांसाठी सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्यात भाजप सरकार अपयशी ठरल्याबद्दल टीका करताना व्हिएगस यांनी महिलांसमोरील आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रत्येक गावात महिला प्रतिनिधी नेमण्याची घोषणा केली.

महिलांवरील वाढत्या घृणास्पद गुन्ह्यांबद्दल चिंता व्यक्त करताना ‘आप’चे आमदार क्रूझ सिल्वा यांनी प्रतिबंधक म्हणून काम करण्यासाठी फाशीच्या शिक्षेची गरज व्यक्त केली.

संपूर्ण भारतातील महिलांवरील लैंगिक अत्याचार, बलात्कार आणि हिंसाचाराच्या वाढत्या घटनांविरोधात सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. सरकारी आणि खासगी दोन्ही क्षेत्रांमध्ये सुरक्षित कार्यस्थळे निर्माण करणे गरजेचे आहे. स्थानिक पोलिस न्याय देण्यात अपयशी ठरल्यास गोव्यातील न सुटलेली प्रकरणे सीबीआयकडे सोपवावीत.
ॲड. अमित पालेकर, ‘आप’चे गोवा राज्य अध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Morjai Temple Case: मोरजाई देवस्थानच्या मालमत्तेत अपहाराचा आरोप! माजी अध्यक्षासह दोघांना अटक; मांद्रे पोलिसांकडून गुन्हा दाखल

Indonesia Passenger Ship: इंडोनेशियात 240 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बेपत्ता; वादळी हवामानामुळे संपर्क तुटल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

Goa Politics: भाजपला तिसऱ्या आघाडीची भीती नाही! दामू नाईकांचा विरोधकांना टोला; '2027 मध्ये पुन्हा भाजपच सत्तेत येणार'

Goa Congress: काँग्रेसची 'गोवा राखण यात्रा' 22 सप्टेंबरपासून! 27 दिवसांत सर्व 40 मतदारसंघांचा दौरा; जमीन, पर्यावरण आणि अस्मितेसाठी लढ्याची घोषणा

Guru Mangal Yuti 2026: 18 सप्टेंबरला महाचमत्कार! गुरु-सेनापती युतीनं चमकणार 4 राशींचं नशीब; हाती लागणार कुबेराचा खजिना

SCROLL FOR NEXT