MLA Venzy Veigas Dainik Gomantak
गोवा

पोस्टाचे गोव्यासाठी स्वतंत्र सर्कल करा; नोकऱ्या महाराष्ट्रातल्या तरुणांना मिळत असल्याने आप आमदाराची मागणी

Goa Assembly Monsoon Session: गोव्यासाठी पोस्टाचे स्वतंत्र सर्कल निर्मिती करण्याची मागणी व्हिएगस यांनी केली.

Pramod Yadav

पोस्टाचे गोवा आणि महाराष्ट्रासाठी एकच सर्कल असल्याने गोव्यातील तरुणांना नोकरीची संधी मिळत नाही. गोव्यासाठी स्वतंत्र सर्कल निर्मिती करण्याची मागणी, आपचे आमदार वेंझी व्हिएगस यांनी केली. विधानसभा पावसाळी अधिवेशनाच्या सतराव्या दिवशी (०६ ऑगस्ट) शून्य प्रहरात आमदार व्हिएगस बोलत होते.

पोस्टाचे गोवा आणि महाराष्ट्रासाठी एकच सर्कल आहे. यामुळे या खात्याच्या गोव्यातील रोजगारसंधी देखील महाराष्ट्रीयन तरुणांना मिळत आहेत. गोमंतकीय तरुण यामुळे रोजगारापासून वंचित राहत असल्याची खंत आमदार व्हिएगस यांनी सभागृहात उपस्थित केली.

गोव्यासाठी पोस्टाचे स्वतंत्र सर्कल निर्मिती करण्याची मागणी व्हिएगस यांनी केली.

दरम्यान, पोस्टातील रोजगारसंधीसाठी दहावीच्या शिक्षणाचा संदर्भ घेतला जातो. दहावीचे मार्क विचारात घेतले जातात. गोवा आणि महाराष्ट्र सर्कल एक असल्याने दहावीचे सर्वाधिक मार्क विचारात घेतले जातात.

गोव्यात पूर्वीच्या शिक्षण पद्धतीनुसार मराठी तिसऱ्या भाषेचा पर्याय होता. कोकणीचा अलिकडे पर्याय म्हणून घेतला जात आहे. गोवा सर्कलचा वेगळा विचार करुन कोकणीचे मार्क विचारात घ्यावे, अशी मागणी केली आहे. याबाबत येत्या काही दिवसांत अंमलबजावणी होणे, अपेक्षित असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: पुराच्या पाण्यातून ट्रॅक्टर घेऊन जाण्याचा जीवघेणा स्टंट, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; नेटकरी व्यक्त करतायेत संताप

Dewald Brevis Century: क्रिकेटचा नवा तारा, डेवाल्ड ब्रेव्हिसने टी-20 मध्ये शतक ठोकून रचला इतिहास, अनेक विक्रम मोडले

Pakistan Terrorist Attack: पाकिस्तान पुन्हा हादरला! बलुचिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; 9 पाकिस्तानी सैनिक ठार

Mungul Firing Case: मुंगुल गोळीबार प्रकरणी गोवा पोलिसांची मोठी कारवाई, 7 अटकेत, 15 जणांविरोधात गुन्हा दाखल

Shubman Gill: गिलने रचला इतिहास! सलग चौथ्यांदा जिंकला ICC 'प्लेअर ऑफ द मंथ' अवॉर्ड; अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू

SCROLL FOR NEXT