Amit Palekar  Dainik Gomantak
गोवा

Amit Palekar : भाजपचे ‘रात्रीस खेळ चाले’ धोरण!

अमित पालेकर यांचा आरोप; वटहुकुमाचा ‘आप’कडून निषेध

गोमन्तक डिजिटल टीम

Amit Palekar : गोवा नगरपालिका कायद्यात सुधारणा घडवून सरकार लोकशाहीचा खून करण्याचे षडयंत्र रचत आहे. आजपर्यंत सर्व निर्णय, मग ते आमदार खरेदी असो किंवा धोरणात्मक सुधारणा, सगळेच निर्णय रात्रीच्या अंधारात घेतले जात असून आता देखील भाजपचे ‘रात्रीस खेळ चाले’ धोरण सुरू आहे, असा टोला आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी हाणला.

पणजी येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ‘आप’चे आमदार वेन्झी व्हिएगस आणि क्रूझ सिल्वा उपस्थित होते. आज भाजप सरकारमुळे देश आणि राज्यातील लोकशाही धोक्यात आली आहे. भाजप ‘ऑपरेशन लोटस’च्या माध्यमातून किंवा इतर मार्गांचा अवलंब करून विरोधक संपवण्याचा कट रचत आहे. मात्र, ‘आप’चे नेते भाजपच्या षडयंत्राला कदापि बळी पडणार नाहीत, असे क्रूझ सिल्वा यांनी ठणकावून सांगितले.

लोकशाही उद्‍ध्वस्त करण्याचा डाव

यापूर्वीच काँग्रेसचे आठ आमदार विकत घेऊन भाजपने गोमंतकीय जनतेचा विश्‍वासघात केला आहे. आता नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने न घेता, ती नगरसेवकांनी हात उंचावून करण्याच्या पद्धतीला मान्यता देण्याबाबतचा वटहुकूम काढला आहे. तळागाळापर्यंत रुजलेली लोकशाही उद्‍ध्वस्त करण्याचा हा भाजप सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोप ॲड. पालेकर यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारतीय तटरक्षक दलाला सलाम...! अरबी समुद्रात बहादुरी गाजवत ईराणी मच्छीमाराला यशस्वीरित्या वाचवले; गोव्यात यशस्वी उपचार VIDEO

Mumbai Children Kidnap Case: मुले आरोपी रोहित आर्यच्या जाळ्यात नेमकी कशी अडकली? धक्कादायक घटनेची A टू Z कहाणी

Goa Crime: पेडणे गोळीबार घटनेला मोठे वळण! तेरेखोल नदीतील अवैध वाळू उपसा प्रकरणी 7 जणांना अटक

Viral Video: अंगावर चिखल उडवणाऱ्या कारचालकाची तरुणीनं मोडली चांगलीच खोड; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, 'भावाने चुकीच्या व्यक्तीशी पंगा घेतला...'

अंधाऱ्या रात्रीत डिव्हायडरजवळ पडला, दारूच्या नशेत उठणंही होतं मुश्किल; 'बिट्स पिलानी'च्या विद्यार्थ्याचा राडा

SCROLL FOR NEXT