पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीमध्ये 10 उमेदवारांची नावं आपकडून घोषित करण्यात आली आहेत. त्यामुळे आता इतर पक्षांकडूनही यादी जाहीर करण्यासाठी हालचाल वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान गोवा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने याआधीच आपली जादी जाहीर केली आहे. त्यानंतर आता आपनेही (Aam Aadmi Party) आपले उमेदवार घोषित करत याची माहिती दिली आहे. यात सांताक्रूझ मतदारसंघातून अमित पालेकर, पर्ये मतदारसंघातून विश्वजीत कृष्णा राणे, शिरोडा मतदारसंघातून महादेव नाईक, वाळपई (Valpoi) मतदारसंघातून सत्यविजय नाईक यांना उमेदवारी मिळाली आहे.
दाबोळी मतदारसंघातून आपने प्रेमानंद नाणोसकर, कुठ्ठाळी मतदारसंघातून एलिना साल्ढाणा, बेणावलीमधून वेंझी विएगास, नावेली मतदारसंघातून प्रतिमा कुतिन्हो, सांगे मतदारसंघात अभिजीत देसाई आणि कुडतरी मतदारसंघात डॉमनिक गावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी ट्वीट करत उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.