AAP Goa Dainik Gomantak
गोवा

AAP Goa: लोकसभा निवडणुकीपूर्वी आपची गोव्यात नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती, 27 सदस्यांची यादी जाहीर

AAP Goa: आम आदमी पक्षाने वेन्झी व्हिएगश व क्रुझ सिल्वा यांची राष्ट्रीय संयुक्त सचिव व राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे.

Pramod Yadav

AAP Goa: लोकसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाने गोव्यात नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. आम आदमी पक्षाने वेन्झी व्हिएगश व क्रुझ सिल्वा यांची राष्ट्रीय संयुक्त सचिव व राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे.

मुख्य शाखेच्या अंतर्गत राज्य युनिटसाठी पाच उपाध्यक्षांची नियुक्ती केली असून, पक्षाच्या वतीने मंगळवारी (दि.26 सप्टेंबर) 27 सदस्यांची यादी जाहीर करण्यात आलीय.

पक्षाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, वाल्मिकी नाईक यांची उत्तर गोव्याचे कार्याध्यक्ष तर जेर्सन गोम्स यांची दक्षिण गोव्याचे कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

तर प्रतिमा कुतिन्हो, संदेश तेलीकर देसाई, सिद्धेश भगत, सुनील सिग्नापूरकर, रॉक मास्कारेन्हस यांची मुख्य विभागांतर्गत प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

गोव्यातील पक्षाच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी सुरेल तिळवे यांच्याकडे सोपवण्यात आली असून, सिद्धेश भगत हे राज्यात पक्षाचे मुख्य प्रवक्तेही असतील

पक्षाच्या अधिसूचनेनुसार, हेन्झेल फर्नांडिस गोव्यात 'आप'च्या अल्पसंख्याक शाखेचे नेतृत्व करणार आहेत. याशिवाय युवा शाखेचे नेतृत्व रोहन नाईक करणार आहे.

राज्यात पक्षाच्या ओबीसी अध्यक्षपदी उपेंद्र गावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुषमा जानू गावडे यांच्याकडे उत्तर गोव्याच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

त्याचबरोबर दक्षिण गोव्यासाठी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी पेट्रीसिया फर्नांडिस यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

अनिल गावकर (अनुसूचित जमाती अध्यक्ष), उपेंद्र गावकर (इतर मागासवर्गीय अध्यक्ष), हांझल फर्नांडिस (अल्पसंख्याक अध्यक्ष) असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT