Dinesh Vaghela Passed Away Dainik Gomantak
गोवा

Dinesh Vaghela Passed Away: आम आदमी पक्षाचे संस्थापक सदस्य दिनेश वाघेला यांचे पणजीत निधन

Dinesh Vaghela Passed Away: गोव्यात आम आदमी पक्षाचा विस्तार करण्यासाठी वाघेला यांचे योगदान महत्वाचे मानले जाते.

Pramod Yadav

Dinesh Vaghela Passed Away

आम आदमी पक्षाचे संस्थापक सदस्य दिनेश वाघेला उर्फ बाबाजी यांचे अल्पशा आजाराने पणजीत निधन झाले. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे ते सदस्य होते. गोव्यात पक्ष उभारणीसाठी त्यांनी सक्रियपणे काम केले.

दिनेश वाघेला (73) यांचे सोमवारी रात्री पणजीतील राहत्या घरी निधन झाले अशी माहिती वाल्मिकी नाईक यांनी दिली.

दिनेश वाघेला यांना बाबाजी म्हणून देखील ओळखले जाते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

सांतिनेज येथील स्मशानभूमीत आज (मंगळवारी, दि. 02 एप्रिल) दुपारी 3.30 वा. अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

AAP च्या अधिकृत वेबसाइटनुसार, वाघेला हे आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते आणि इंडिया अगेन्स्ट करप्शन चळवळीनंतर पक्षात सामील झालेल्या सर्वात आधीच्या सदस्यांपैकी ते एक होते. गोव्यात आम आदमी पक्षाचा विस्तार करण्यासाठी वाघेला यांचे योगदान महत्वाचे मानले जाते.

मूळ गुजरातचे रहिवासी असणारे वाघेला गोव्यात वास्तव्यास होते. अधिकृत वेबसाइटनुसार, वाघेला AAP च्या शिस्तपालन समितीचे प्रमुख होते. पणजीतील सांतिनेज येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Taxi Issue: 'विश्वास ठेवला अन् सरकारनं फसवलं'; टॅक्सी व्यावसायिकांची मंत्रालयाबाहेर गर्दी, सीएमनी दिला Busy असल्याचा मेसेज

Nano Banana Trend: CM सावंतांचा डिजिटल अवतार! नॅनो बनाना ट्रेण्डचा 'नवा लूक' सोशल मीडियावर Viral

Marathi: 'हा भाषेचा नाही, पोर्तुगिजांच्या 450 वर्षांच्या छळातून रक्षण केलेल्या भवितव्याचा प्रश्न'; मराठी राजभाषा बैठकीत चर्चा

Goa: गोव्याचा जन्मदर, मृत्यूदर किती आहे? वाचा ताजा अहवाल..

Bicholim: डिचोलीतील ‘पे पार्किंग’ प्रस्ताव अजूनही घुटमळतोय! कंत्राटदार कंपनीचा प्रतिसाद नाही; पालिकेसमोर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT