Valmiki Naik Aam Aadmi Party Dainik Gomantak
गोवा

खराब रस्त्यांमागे भ्रष्टाचार हेच कारण : आप

रस्त्यांवरील खड्डे आणि अटल सेतूवरील खराब झालेल्या रस्त्यावरुन आम आदमी पार्टी आक्रमक

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यातील रस्त्यांवरील खड्डे आणि अटल सेतू पुलावरील खराब झालेला रस्ता हे भ्रष्टाचाराचे मुख्य कारण असल्याची टिका आम आदमी पक्षाने केली आहे. पक्षाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार बैठकीत वाल्मिकी नाईक, सेसिल रॉड्रिगीस, सुनील शिंगणापूरकर उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असल्याने राज्यात रस्ते दुरुस्तीचे काम रेंगाळलेले आहे. अटल सेतूवरील कामासाठी निकृष्ट दर्जाचे वापरले आहे. त्यामुळेच सातत्याने खड्डे पडत आहेत. या कामासाठी मद्रास आयआयटीकडून चाचणी करून घेण्यात येणार आहे. मात्र, मुळातच हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने संबंधितांवर कारवाई होणे गरजेचे आहे, अशी मागणीही पत्रकार परिषदेत वाल्मिकी नाईक यांच्याकडून करण्यात आली.

राज्यातील मुख्य रस्ते, शहरांना जोडणारे आणि गावातील रस्ते वर्षानुवर्षे खड्ड्यांनी भरलेले आहेत. गेल्या चार वर्षांत सातत्याने खड्डे बुजवल्याचे सांगून जनतेची दिशाभूल करीत आहे. बुजवलेले खड्डे आठ ते पंधरा दिवसांत पुन्हा डोके वर काढत आहेत. सरकारने जनतेच्या डोळ्यात चालवलेली ही धूळफेक आहे. सरकारने उत्तम दर्जाचे साहित्य वापरून पक्के रस्ते निर्माण करावेत, अशी मागणी सेसिल रॉड्रिगीस यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT