AAM Aadmi Party have aim to make women self-sufficient says AAP MLA Atishi Marlena Dainik Gomantak
गोवा

देशातील महिलांना स्वयंपूर्ण बनविणे हेच आपचे उद्दिष्ट, आतिशी मार्लेना यांचा गोवा विजयाचा दावा

आमचे निवडून येणारे उमेदवार दर्जेदार शिक्षण, उत्तम रुग्णालये आणि इतर मूलभूत सुविधा देण्यासाठी काम करतील: Atishi Marlena

दैनिक गोमन्तक

दिल्लीच्या आमदार आणि आम आदमी पार्टीच्या (AAP) गोवा प्रभारी आतिशी मार्लेना (Atishi Marlena) शुक्रवारी फातोर्डा येथे झालेल्या परिवर्तन यात्रेत सहभागी झाल्या होत्या . यात त्यांनी इतर पक्षांचे राजकारणी पक्ष बदलण्यात व्यस्त आहेत, तर आप राज्याचा विकास नकाशा तयार करण्यात व्यस्त आहे असे सांगतच यावेळी राज्यात बदल होऊन ‘आप’ची सत्ता येणार आहे, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे .यावेळी आपचे उपाध्यक्ष संदेश तेलेकर देसाई आणि मडगाव आपचे नेते लिंकन वाझहेही उपस्थित होते.(AAM Aadmi Party have aim to make women self-sufficient says AAP MLA Atishi Marlena)

त्याचबरोबर आम्हाला विश्वास आहे की, आमचे निवडून येणारे उमेदवार दर्जेदार शिक्षण, उत्तम रुग्णालये आणि इतर मूलभूत सुविधा देण्यासाठी काम करतील. आतापर्यंत निवडून आलेले इतर पक्षाचे प्रतिनिधी पाच वर्षांत मोठमोठ्या गाड्या, बंगला बांधणे, स्विस बँकेत खाते उघडत असल्याचे आपण पाहात आलात हे घडत असताना आपल्या आयुष्यात मात्र काहीही बदल नाही, अस फातोर्डा येथील मेळाव्याला संबोधित करताना आतिशी म्हणाल्या.आमदारांना फक्त स्वतःच्या प्रगतीची काळजी असते. गेल्या निवडणुकीत जनतेने काँग्रेसवर विश्वास ठेवला आणि त्यांना मतदान केले, परंतु भाजपने त्यांच्यावर पैशांचा वर्षाव केल्यावर काही आमदारांनी पक्ष बदलले. ही गोव्यातील राजकारणाची स्थिती आहे, असे त्या पुढे म्हणाल्या.

केजरीवाल यांनी मोफत वीज आणि मोफत तीर्थयात्रा देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी टॅक्सीचालकांसाठी महामंडळ स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे. आज लोकसंख्येच्या 50 टक्के महिला आहेत, परंतु तरीही त्या घरातील पुरुषांवर अवलंबून आहेत. त्यांचा विचार करून केजरीवाल यांनी गृहआधार योजनेत 1500 वरून 2500 रु. महिना रकमेत वाढ आणि 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक महिलांना 1000 रुपये देण्याची घोषणा केली. त्याचबरोबर रोजगार निर्मितीचे आश्वासन दिले. आपचे उपाध्यक्ष संदेश तेलेकर देसाई यांनीही यावेळी विचार मांडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: "हुकमी पदकविजेती, पण खिशात पैसे नाहीत!" साक्षी काळेची धाव आता आर्थिक अडचणींच्या ट्रॅकवर; आशियाई पॅरा गेम्समधील सहभागही टांगणीला

Margao Merchant Association: मडगावात पिंपळकट्ट्यावर भिकाऱ्यांचा उच्छाद, दारु पिऊन धिंगाणा; न्यू मार्केट व्यापारी संघटनेचा संताप

गोव्यात पर्यटकांच्या जिवाशी खेळ! समुद्रकिनारी बेदरकार गाडी चालवणं कोल्हापूरच्या पर्यटकाला पडलं महाग; पोलिसांनी दाखवला इंगा

नोकरी मागे धावण्यापेक्षा उद्योजक बना! स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची गोमंतकीय तरुणांना सुवर्णसंधी; मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेचे विशेष पाऊल

Goa Petrol Stock Status: गोव्यात मुबलक इंधनसाठा! अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पेट्रोल डीलर असोसिएशनचं आवाहन; नरहर ठाकूर यांनी स्पष्टचं सांगितलं

SCROLL FOR NEXT