Amit Palekar  Dainik Gomantak
गोवा

Aam Aadmi Party: गोव्‍याच्‍या चेकनाक्‍यांवर भ्रष्टाचार शिगेला :ॲड. अमित पालेकर

गोमन्तक डिजिटल टीम

Aam Aadami Party Amit Palekar: पणजी, राज्यातील चेकनाक्‍यांवर मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने काही दिवसांपूर्वीच केला होता.

सोमवारी तर ‘आप’च्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने काणकोणच्या चेकपोस्टवर स्टिंग ऑपरेशन करत या भ्रष्टाचाराचा पर्दाफाशच केला.

या प्रकरणात पोलिस, अबकारी खाते, वाहतूक खाते आणि मार्केटिंग फेडरेशन सहभागी असल्याचा आरोप करत प्रत्यक्ष सरकारच जबाबदार असल्याचे ‘आप’चे राज्य संयोजक ॲड. अमित पालेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

राज्यात भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. गेल्या आठवड्यातच ‘आप’ने चेक पोस्टवरील भ्रष्टाचाराची माहिती दिली होती. सोमवारी रात्री आम्ही स्टिंग ऑपरेशन करत हा भ्रष्टाचार उघडकीस आणला.

राज्यातून बाहेर जाण्यासाठी आणि बाहेरून राज्यात येण्यासाठी वाहतूकदारांकडून २० रुपयांपासून १५०० रुपयांपर्यंत पैसे आकारले जातात. त्याची कोणतीच पावती दिली जात नाही आणि हे पैसे त्रयस्थ व्यक्तींकडून वसूल केले जातात, असा आरोप पालेकर यांनी केला. या विरोधात आम्ही काणकोण पोलिसांत तक्रार दाखल केली आहे, असेही ते म्‍हणाले.

काणकोण चेकपोस्टला आम्‍ही भेट दिली असता येथील कर्मचाऱ्यांनी जमा केलेले पैसे घेऊन जंगलात पळ काढला. काही काळ या चेकपोस्टवर कोणीच कर्मचारी नव्हते.

तेथील कर्मचाऱ्यांच्या जागी ‘आप’चे कार्यकर्ते बसले असता वाहतूकदार २० रुपयांपासून १५०० रुपये आणून देत होते. विशेष म्‍हणजे कोणीच पावती मागत नव्हते.

- ॲड. अमित पालेकर, ‘आप’चे राज्य संयोजक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

SCROLL FOR NEXT