Tonir Waterfall Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: ट्रिप जीवावर बेतली! मध्य प्रदेशातील तरुण गोव्यात बुडाला; तोणीर-काजरेघाट धबधबा धोकादायक

Tonir Waterfall: सावर्डे पंचायत क्षेत्रातील काजरेघाट येथील ‘तोणीर’ धबधब्यावर सहलीसाठी आलेल्या सात जणांपैकी एक जण बुडाला.

गोमन्तक डिजिटल टीम

सावर्डे : सावर्डे पंचायत क्षेत्रातील काजरेघाट येथील ‘तोणीर’ धबधब्यावर सहलीसाठी आलेल्या सात जणांपैकी एक जण बुडाला. ही घटना आज बुधवारी संध्याकाळी घडली. पंकज राजपूत (३०, रा. मध्यप्रदेश) असे त्‍याचे बुडालेल्‍या युवकाचे नाव असून तो कांदोळी येथील ताज हॉटेलमध्ये कामाला होता.  वाळपई अग्नीशमन दल व पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत शोध घेतला, परंतु त्याचा थांगपत्ता लागू शकला नाही.

मिळालेल्‍या माहितीनुसार, सत्तरी तालुक्यातील डोंगरमाथ्यावरून कोसळणारे धबधबे आकर्षण तेवढेच धोकादायक ठरत आहेत. कांदोळी येथून सात जणांचा एक गट ‘तोणीर’ धबधब्यावर सहलीसाठी आला होता. आंघोळ करत असताना पंकज राजपूत याला पाण्‍याचा अंदाज आला नाही व वाहून गेला.

घटनेची माहिती मिळताच वाळपई पोलिस, अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन शोधकार्य सुरू केले. मात्र रात्री उशीरापर्यंत त्‍याचा पत्ता लागला नाही. आता उद्या गुरुवारी सकाळी पुन्हा शोध घेण्यात येणार आहे.

सध्या परतीच्या पावसाचा जोर असून सत्तरीत नद्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांना पाण्याच्या अंदाज येत नसल्‍याने बुडण्‍याचे प्रकार वाढले आहेत. पोलिस निरीक्षक विदेश शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. तसेच वाळपई अग्निशमन दलाचे अधिकारी संतोष गावस यांच्या मार्गदर्शनाखाली जवांनीनी शोधकार्य राबवले.

गेल्‍या वर्षी दोघांचा बुडून मृत्‍यू

तोणीर-काजरेघाट धबधब्‍याचे पात्र खोल आहे. पर्यटकांना याची कल्‍पना नसते. काही पर्यटक दारू पिऊन तेथे धांगडधिंगाणा घालतात. गेल्या वर्षी याच ठिकाणी आठजणांचा गट सहलीसाठी आला असता त्‍यातील दोघा युवकांचा बुडून मृत्‍यू झाला होता. आज पुन्‍हा अशीच घटना घडल्‍याने हे ठिकाण चर्चेचा विषय बनले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panjim: "गोव्यातील कलाकारांनाही मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी द्यावी", CM सावंतांचे प्रतिपादन

वाळपई जवाहर नवोदय विद्यालयाच्या जमिनीचा वाद, सरकारने हस्तक्षेप करावा; पालकांची मागणी

ZIM vs NZ: न्यूझीलंडने 67 वर्षांचा विक्रम मोडला, कसोटी इतिहासातील तिसरा सर्वात मोठा विजय नोंदवला

Horoscope: राजराजेश्वर योगाचा शुभ प्रभाव; ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात 'या' 6 राशींना मिळेल यश आणि सन्मान

Redmi Smartphone: आता फोन चार्जिंगचं नो टेन्शन, रेडमी लॉन्च करणार 9000 mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन

SCROLL FOR NEXT