Agonda  Dainik Gomantak
गोवा

Agonda News : आगोंद येथे पुन्‍हा जलवाहिनी फुटली

Agonda News : मागच्या ग्रामसभेत पाण्‍याच्‍या टाकीची सफाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Agonda News : आगोंद, आगोंदला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी पुन्‍हा एकदा फुटल्‍यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. हा प्रकार मध्‍यरात्री घडला.

आज रविवारी सकाळी स्थानिक नागरिक दिनकर नाईक गावकर यांनी ही बाब संबंधितांच्या लक्षात आणून दिल्यानंतर दुपारी पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जलवाहिनीची तातडीने दुरुस्ती केली.

गेल्या महिनाभरात तिसऱ्यांदा ही जलवाहिनी फुटली आहे. कमकुवत व जीर्ण झालेली ही जलवाहीनी बदलून नवीन जलवाहिनी टाकणे गरजेचे बनले आहे. वारंवार जलवाहिनी फुटत असल्‍याने नागरिकांना पाणीपुरवठा तर होत नाहीच शिवाय दुरुस्ती केल्यावर पाण्याच्या टाकीत गढूळ पाणी जाते.

मागच्या ग्रामसभेत पाण्‍याच्‍या टाकीची सफाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. याबाबत बोलताना दिनकर नाईक गावकर यांनी सांतिगले की, गेल्या कित्येक वर्षांपासून पाण्याच्या टाकीची सफाईच केलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT