Mapusa Market Dainik Gomantak
गोवा

Mapusa Market: अखेर त्याने मागितली माफी; म्हापसा मार्केटला संबोधले होते ‘चोर बाजार’

Mapusa Market: म्हापसा मार्केटला ‘चोर बाजार’ असे संबोधणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे मार्केटची बदनामी केल्याबद्दल व्हिडिओ टाकणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी म्हापसा व्यापारी संघटनेतर्फे करण्यात आली होती.

दैनिक गोमन्तक

Mapusa Market: म्हापसा मार्केटला ‘चोर बाजार’ असे संबोधणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे मार्केटची बदनामी केल्याबद्दल व्हिडिओ टाकणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी म्हापसा व्यापारी संघटनेतर्फे करण्यात आली होती. यासंदर्भात व्हिडिओ बनविणाऱ्या युवकाला सोमवारी (ता.११) म्हापसा पोलिसांनी चौकशीला बोलविले होते.

संपूर्ण प्रकरण असे की, साधारण दोन महिन्यांपूर्वी कळंगुटमधील अशोक भाटी (२२) या युवकाने त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हापसा मार्केटबद्दल आक्षेपार्ह माहिती पसरवणारा व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये तो हे मार्केट गोव्याचा ‘चोर बाजार’ असल्याचे सांगत होता.

तो व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर व्हिडिओ प्रकाशित करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीपाद सावंत आणि सचिव सिद्धेश राऊत यांनी म्हापसा पोलिसांना केली.

दरम्यान, सोमवारी सायंकाळी अशोक भाटी याला पोलिसांनी चौकशीला बोलावले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. अनावधानाने आपण हा व्हिडिओ बनवला असून, पुन्हा अशी चूक करणार नसल्याचे अशोक भाटी याने सर्वांसमोर हात जोडून मान्य केले.

तसेच तो व्हिडिओ आपल्या अकाउंटवरून डिलिट करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याला समज देत पुन्हा असे कोणतेच कृत्य न करण्याची ताकीद देऊन सोडून दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT