Goa Police | Anjuna Beach  Dainik Gomantak
गोवा

Anjuna News: हणजुणे बीचवर बुडणाऱ्या पाँडिचेरीच्या पर्यटकाला दोन पोलिसांनी वाचवले

दोन्ही पोलिस कॉन्स्टेबलचे सर्वस्तरातून कौतूक

Akshay Nirmale

Goa Police: उत्तर गोव्यातील हणजुणे येथील समुद्रात बुडणाऱ्या पाँडिचेरीच्या एका पर्यटकाचा जीव दोन पोलिस कॉन्स्टेबल्समुळे वाचला. पी. दिलिपसिवम पोन्नामबलम (वय 33) असे या पर्यटकाचे नाव आहे.

तो सोलो ट्रॅव्हलर आहे. तर त्याचा जीव वाचविणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबलचे नाव आहे, अभिनय मलिक आणि सुशांत गाडेकर.

हणजुणे बीच येथे हा पोन्नामबल हे समुद्र स्नानासाठी म्हणून पाण्यात उतरला होता. पण त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो गटांगळ्या खाऊ लागले.

त्याला बुडताना पोलिस कॉन्स्टेबल अभिनय मलिक आणि सुशांत गाडेकर यांनी पाहिले. त्यांनी वेळ न दवडता तत्काळ त्याच्या दिशेने धाव घेतली.

आणि त्याला पाण्यातून बाहेर काढले. दोन्ही पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे या पर्यटकाचा जीव वाचला. त्यामुळे परिसरातील सर्वजण पोलिसांचे कौतूक करत होते.

गोव्यात पर्यटन हंगामात अनेक पर्यटक येत असतात. वारंवार सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अनेक पर्यटकांवर अशी पाण्यात गटांगळ्या खायची वेळ येते.

गेल्याच महिन्यात बंगळूरच्या सहा पर्यटकांना दृष्टी मरिनच्या लाईफगार्ड्सनी बुडण्यापासून वाचवले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT