Ridley baby turtle dainikgomantak
गोवा

इवल्या इवल्यांशा पावलांनी रिडले कासवांची पिल्ले लाटांवर स्वार

38 ऑलिव्ह रिडले कासवांची पिल्ले गलगीबाग येथे समुद्रात सोडण्यात आली

दैनिक गोमन्तक

पणजी: सुमारे 38 ऑलिव्ह रिडले समुद्री कासवाची पिल्ले गोवा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गालजीबाग, काणकोण येथे समुद्रात सोडली. गालजीबाग आणि आगोंद येथे नामशेष होणाच्या मार्गावर असणाऱ्या या कासवांची डिसेंबर 2021 पासून 23 घरटी मिळाली होती. त्यांचे योग्य संवर्धन केल्याने आज 38 ऑलिव्ह रिडले समुद्री कासवाची पिल्ले (Ridley baby turtle) इवल्या इवल्यांनी त्यांच्या नैसर्गिक अधीवासात गेली आहेत.

(A total of 38 baby hatchlings were released into the sea near Galgibag)

याच्या आधी आगोंद (Agonda) व गालजीबाग येथील कासव संवर्धनासाठी आरक्षित समुद्र किनाऱ्यावर उशिरा का होईना सागरी कासवांच्या आगमनामुळे वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले होते. या दोन्ही ठिकाणी 24 कासवांनी एकूण 17 घरट्यांमध्ये 570 अंडी घातली. ही सर्व अंडी संरक्षित केली आहेत. त्यावेळी 4 ऑलिव्ह रिडले (Ridley)कासवांची पिल्ले समुद्रात (sea) सोडण्यात आली होती.

तर 31 डिसेंबर रोजी पहाटे या हंगामातील पहिल्या सागरी कासवाने 118 अंडी घातली होती. तर 3 जानेवारी रोजी 2 रिडले कासवांनी 90 अंडी दिली. तर आणखी एका कासवाने 118 अंडी घातली होती. या घटनेची माहिती मिळताच बार्से येथील वन खात्याचे अधिकारी आणि अन्य कर्मचाऱ्यांनी या केंद्राला भेट देऊन पाहणी केली होती.

दरम्यान गोव्याचे (goa) तत्कालीन मंत्री तथा आगोंदचे सुपुत्र स्व. संजय बांदेकर यांच्या प्रयत्नांतून उत्तर गोव्यात मोरजी तर दक्षिण गोव्यात आगोंद आणि गालजीबाग असे तीन समुद्र किनारे कासव संवर्धनाकरिता राखीव ठेवण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT