Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident News: भरधाव दुचाकी गाईला धडकली; अपघातात युवक जागीच ठार

शिवनगर-तिळामळ येथील घटना

Akshay Nirmale

Goa Accident News: राज्यातील वाढते अपघात व होणाऱ्या मृत्यूची संख्या पाहता पोलिसांनी जागोजागी उभे करून वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचा धडाका लावला असला तरी अपघातांची संख्या कमी होत नाही.

गुरूवारी सकाळी शिवनगर-तिळामळ येथे दुचाकीस्वाराने गाईला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मुस्लिमवाडा केपे येथील वसीम खान (23) याचे जागीच निधन झाले.

केपे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ६.३० वा. शिवनगर येथील मुख्य रस्त्यावर एक युवक जखमी अवस्थेत पडून असल्याचे सकाळी जॉगिंगला गेलेल्या एका व्यक्तीने पाहिले.

याची माहिती पोलिसांना दिली असता पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन १०८ रुग्णवाहिकेतून त्याला केपे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केल्याचे पोलिसांनी सांगितले.

वसीम खान हा कुडचडे येथे कामाला होता व सकाळी तो आपल्या दुचाकीने कामावर जात असताना हा अपघात झाल्याचे लोकांनी सांगितले. केपे पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन केला असून पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT