Colva Beach Dainik Gomantak
गोवा

Colva Beach: समुद्रात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

Colva Beach: कोलवा येथील घटना: अथक प्रयत्नांनंतर संध्याकाळी सापडला मृतदेह

दैनिक गोमन्तक

Colva Beach: आपल्या मित्रांसमवेत कोलवा समुद्रकिनाऱ्यावर स्नानासाठी गेलेला वेलेंगिनो पिंटो (वय १५, रा. कोलवा) हा समुद्रात बुडण्याची घटना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. दिवसभराच्या शोधानंतर त्याचा मृतदेह माजोर्डा येथील किनाऱ्यावर सायंकाळी सापडल्याची माहिती कोलवा पोलिसांनी दिली.

शाळेला सुट्टी असल्याने कोलवा येथील चार मुले फुटबॉल खेळण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर गेली होती. फुटबॉल खेळल्यानंतर ते अंघोळीसाठी समुद्रात उतरले. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने ही सर्व अल्पवयीन मुले समुद्रात गटांगळ्या खाऊ लागली. यावेळी प्रसंगावधान राखून तिघेजण समुद्राबाहेर आले, पण वेलेंगिनो पिंटो हा समुद्रात बुडाला. स्थानिक मच्छीमारांनी रापणीचे जाळे टाकून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तो सापडू शकला नाही.

समुद्राला भरती आलेली असल्याने किनाऱ्यावर लाल झेंडा लावून धोक्याची सूचना देण्यात आली होती, तरीही ही चार मुले अंघोळीसाठी समुद्रात उतरली होती. भरतीमुळे मोठ्या लाटा येत असल्याने त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही व चारहीजण पाण्यात बुडू लागले. त्यातील वेलेंगिनो बुडाला.

जीवरक्षकांचे दुर्लक्ष

स्थानिक मच्छीमार दुमिंगो रॉड्रिग्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार, भरतीची वेळी मुले समुद्रात उतरलेली असताना नजीकच्या टॉवरवरील जीवरक्षकांनी तत्काळ त्यांना बाहेर येण्यासाठी सांगणे गरजेचे होते, परंतु त्यांनी कोणत्याही सूचना केल्या नाहीत. पाण्यातून बाहेर आलेल्या एका मुलाने धावत जाऊन जीवरक्षकांना माहिती दिल्यानंतर त्यांनी तेथे येऊन बुडालेल्या वेलिंगिनोचा शोध घेतला, परंतु तो सापडू शकला नाही.

आईचे दीड वर्षापूर्वीच निधन

वेलेंगिनो पिटो हा आपले वडील व लहान भाऊ यांच्यासह पोतवाड - कोलवा येथील एका भाड्याच्या खोलीत रहात होता. त्याची आई मासळी विक्रेती होती, दीड वर्षापूर्वीच तिचे निधन झाले होते. मायेचे छत्र हिरावल्याने या दोन्ही भावंडांचा नियतीने आधार हिरावला होता, असे कोलवा पंचायतीचे माजी सरपंच अँथनी (माम) फर्नांडिस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

Vedanta Mining Dispute: पिळगावात दुसऱ्या दिवशीही खनिज वाहतूक बंद; शेतकरी मागणीवर ठाम

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार! म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

SCROLL FOR NEXT