Goa Tourist Death Dainik Gomantak
गोवा

Goa Tourist Death: बायणा समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकाच्या मृत्यूचं कोड उलगडलं; पोस्टमार्टम रिपोर्टमधून सत्य आलं समोर!

Bengaluru Tourist Death At Baina Beach: बायणा समुद्रकिनाऱ्यावर रविवारी (10 नोव्हेंबर) बंगळुरुतील पर्यटक संजय श्रीनिवास यांचा जलक्रिडेनंतर परतत असताना मृत्यू झाला.

Manish Jadhav

पणजी: बायणा समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकाचा मृत्यू कशामुळे झाला, याचे प्राथमिक कारण शवविच्छेदनातून उघड झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने संजय यांचा मृत्यू झाल्याचं अहवालातून समोर आले आहे. रविवारी (10 नोव्हेंबर) एका पर्यटकाचा जलक्रीडेदरम्यान मृत्यू झाला होता आणि या प्रकरणात संशयाची सुई ही साहसी खेळांमध्ये पर्यटकांच्या सुरक्षेकडे होणाऱ्या दुर्लक्षाकडे वळली होती.

बंगळुरूत राहणारे संजय श्रीनिवास हे कुटुंबासह गोव्यात आले होते. रविवारी जलक्रीडा आणि अन्य साहसी खेळांसाठी संजय आणि त्यांचे कुटुंब बायणा समुद्रकिनाऱ्यावरून बोटीने निघाले होते. पॅरासेलिंग झाल्यावर स्कुबा डायव्हिंगसाठी जाताना संजय यांना बोटीतच अस्वस्थ वाटू लागले. त्यांना किनाऱ्यावर आणून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते.

राज्यातील समुद्रकिनाऱ्यावर जलक्रीडा आणि साहसी खेळांचे आयोजन करणाऱ्या एजंट्सनी धुमाकूळ घातला आहे. ते पर्यटकांकडून अवाजवी पैसे घेतात. मात्र त्यांच्या सुरक्षेकडे डोळेझाक करतात, अशी माहिती स्थानिक नागरिकांकडून देण्यात आली. दरम्यान, राज्यात पर्यटन हंगाम सुरु झाला आहे. देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने गोव्यात दाखल होत आहेत. समुद्रकिनाऱ्यावर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्यात यावी अशी मागणी आता या घटनेनंतर होऊ लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT