Injuerd German citizen Dainik Gomantak
गोवा

Paragliding : जर्मनच्या पर्यटकावर थेट पॅराग्लायडर कोसळला अन् त्याने गमावली हाताची पाचही बोटे

बेतालभाटीच्या समुद्रकिनारी घडला प्रकार

गोमन्तक डिजिटल टीम

Paragliding : समुद्राच्या लाटांच्या साथीने आपला प्रत्येक ख्रिसमस गोव्यात साजरा करणाऱ्या एका वयोवृध्द जर्मन जोडप्यासाठी यंदाचा मोसम भयानक ठरला. समुद्र किनाऱ्यावर जे अनिर्बंध समुद्रक्रीडेचे प्रकार चालतात त्याचा फटका या दाम्पत्याला बसला. येथे चालू असलेल्या पॅराग्लायडींगची धडक बसल्याने जर्मन नागरिकांवर आपल्या हाताची पाच बोटे गमावण्याची पाळी आली.

ही दुर्देवी दुर्घटना २४ नोव्हेंबर रोजी घडली. ख्रिसमस गोव्यात साजरा करण्यासाठी जर्मन जोडपे बेतालभाटी येथे एका गेस्ट हाऊसमध्ये उतरले होते. हे जोडपे सायंकाळच्या वेळी समुद्र किनाऱ्यावर चालत जात असताना एक पॅराग्लाईड जेट त्यांच्या अंगावर आले. आपले डोके सांभाळण्यासाठी त्यांनी आपले हात डोक्यावर घेतले. त्यामुळे त्यांचे डोके सही सलामत राहिले खरे, पण त्यांचा हात गंभीर जखमी झाल्याने डायटर ईचलर (८७) या जर्मन नागरिकाला इस्पितळात दाखल करावे लागले. त्यांच्या उपचारांवर या दाम्पत्याला एकूण सात लाखाचा खर्च करावा लागला. एवढे करूनही त्यांच्या हाताची बोटे काही ठीक होऊ शकली नाहीत.

पालये, केरी या गावांच्या, लोकवस्तीच्या परिसरात चालणारा मोटर ग्लायडिंगचा व्यवसाय अवैधरित्या सुरू असल्याचा आरोप स्थानिकांचा आहे. यावर बंदी घालावी अथवा या व्यवसायाचे लोकवस्ती नसलेल्या ठिकाणी स्थलांतर करावे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress Crisis: गोव्यात काँग्रेसला पर्याय शोधत विरोधकांची तिसरी आघाडी तयार? BJP विरोधात नवे प्रादेशिक पक्ष सज्ज

Brock Lesnar Retirement: 10 वेळचा WWE वर्ल्ड चॅम्पियन ब्रॉक लेसनर निवृत्त; म्हणाला, 'योग्य वेळी थांबण्याचा निर्णय...'

Goa Politics: भाजपने गोव्याला केले ‘नशायुक्त’ राज्य; भाजप सरकारवर काँग्रेसचा घणाघाती आरोप

Horoscope: गुरुवार ठरणार खास! 'या' राशींना नोकरी-व्यवसायात मोठं यश, धनलाभ आणि प्रगतीचे प्रबळ संकेत

Goa Fast Track Immigration: गोव्यात सुरू होणार 'फास्ट ट्रॅक इमिग्रेशन'; गृहमंत्री अमित शहा आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT