Traffic Rule Dainik gomantak
गोवा

Goa Traffic Rule: भावांनो... एक जूनपासून वेगावर मर्यादा ठेवा!

अधिसूचना जारी : राज्यातील रस्त्यांवर 21 ठिकाणी वाहन वेगमर्यादा; अन्यथा तालांव

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Traffic Rule: राज्यातील राष्‍ट्रीय व राज्य महामार्ग तसेच काही शहरी भागातील रस्त्यांवरील 21 ठिकाणी वाहनांच्या वेगमर्यादेविषयी गुरुवारी अधिसूचना जारी करण्यात आली.

त्यामुळे यापुढे चालकांना वाहनाच्या वेगावर लक्ष द्यावेच लागणार आहे. अन्यथा मोबाईलवर चलन मिळू शकते. पणजीतील बहुतेक सर्व रस्‍त्यांवरील वेगमर्यादा ४० किलोमीटर प्रतितास ठेवली आहे.

अशी असेल वेगमर्यादा (प्रतितास)

  • बाणस्तारी पूल, शिरदोण पूल तसेच नवा, जुना मांडवी पूल - ४० किमी

  • दिवजा सर्कल ते जुने गोवे दर्गा, हात कातरो खांब ते बाणस्तारी पूल - ४० किमी

  • मेरशी सर्कल ते हात कातरो खांब (व्हाया कदंब पठार) - ७० किमी

  • कदंब सर्कल ते शिरदोण पूल ते झुआरी पूल - (दुचाकी- ६०), (चारचाकी- ७०), प्रवासी वाहने ६० किमी.

  • मिरामार विज्ञान केंद्र ते दोनापावल - 60 किमी.

  • दिवजा सर्कल ते मिरामार सर्कल - 60 किमी

  • एनआयओ सर्कल ते गोमेकॉ जंक्शन- 60 किमी

  • करंझाळे येथील अंतर्गत मार्ग - 40 किमी

  • पणजीतील अंतर्गत मार्ग - 40 किमी

  • नव्या झुआरी पुलावर 30 किलोमीटर प्रतितास वेग

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारतासाठी खूशखबर! कॅन्सर आणि दुर्मिळ आजारांच्या औषधांना 100 टक्के टॅरिफमधून सूट, अमेरिकेत भारतीय औषधांची निर्यात होणार सोपी

Viral Post: "आई-वडिलांना देव मानू नका..." CEO च्या 'त्या' वादग्रस्त पोस्टने खळबळ; सोशल मीडियावर दोन गटांत जुंपली, वाचा संपूर्ण प्रकरण

Election Commission: धुके दाटलेले... निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासाचा कस

संपादकीय: पैशांची मस्ती अन् सत्तेचा माज...

Telangana CM Controversial Statement: 'प्रभु श्री राम श्रीमंतांचे, तर भगवान शिव गरिबांचे देव', काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानं खळबळ; भाजप आक्रमक VIDEO

SCROLL FOR NEXT