Noida engineer viral post: महागड्या त्रस्त झाभाड्यामुळे कंटाळून आणि सिमेंटच्या जगातील कंटाळवाण्या दृश्यांना वैतागून एका नोएडास्थित व्यक्तीने थेट गोवा गाठलं आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीने तब्बल ६४ हजार रुपयांचा भाड्याचा फ्लॅट सोडून आता फक्त १९ हजार रुपयात गोव्यातील एका सुंदर ठिकाणी आनंदात जगणं पसंत केलंय.
राज नावाच्या या सोशल मीडिया युझरने X म्हणजेच ट्विटरवर अनुभव मांडलाय. या पोस्टमध्ये तो म्हणतोय की मागच्यावर्षी नोएडा येथील ज्या बाल्कनीतून त्याला निराश करणारे दृश्य दिसायचं त्याच घरासाठी तो दर महिन्याला मोठी रक्कम मोजत होता. मात्र, आता गोव्यात आल्यापासून चित्र पालटलं आहे.
सोशल मीडियावर राजने गोव्यातील त्याच्या नवीन घराचा फोटो शेअर केला आहे, ज्यात एक आकर्षक व्हरांडा आणि हिरवीगार झाडी पाहायला मिळतेय. फोटोला कॅप्शन देताना त्याने म्हटलंय, "अपडेट: गोव्यात शिफ्ट झालो. १९ हजार भाडे एकदम वसूल!"
राजचा हा निर्णय केवळ आर्थिक फायद्याचा नाही, तर त्याच्या जीवनशैलीतही मोठा बदल घडवणारा आहे. त्याची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून, अनेकजण यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
त्याच्या या पोस्टवर येणाऱ्या अनेक कमेंट्सपैकी काहींवर बोलताना राजने सांगितलं की तो दोन आठवड्यांपूर्वीच गोव्यात आला असून त्याचा अनुभव आतापर्यंत खूपच चांगला आहे. स्थानिकांकडून कोणतीही नकारात्मक प्रतिक्रिया मिळाली नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं. विशेष म्हणजे, त्याच्या नवीन घरात इन्व्हर्टर आणि चांगलं वाय-फाय कनेक्शन देखील असल्याचं तो म्हणालाय.
तुम्हाला माहितीये का नोएडा सारख्या मोठ्या शहरातून गोव्यात येणारा राज हा एकटाच नाही. आणखी एका X युजरने आपला अनुभव शेअर करत सांगितलं की तो देखील नोएडातून दक्षिण गोव्यात शिफ्ट झाला आणि त्याला फक्त १५ हजार रुपयात फर्निचरसहित २ बीएचके अपार्टमेंट मिळालं आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.