Political Reservation  Dainik Gomantak
गोवा

Political Reservation: एसटी राजकीय आरक्षण : श्रेय लाटण्यासाठीचा नवा वाद सुरू

Political Reservation: आरजी-गाकुवेध आमने सामने; आरजीने ‘एसटी’चा वापर केल्‍याचा आराेप

दैनिक गोमन्तक

Political Reservation:

एसटी आरक्षण प्रश्‍नावरून एसटींच्‍या वेगवेगळ्‍या संघटनांमध्‍ये फूट पडल्‍याचे दिसू्न येत असतानाच आता या आरक्षण प्रक्रियेला चालना देणारे कोण यावरून वादही सुरू झाला आहे. आमच्‍या भयामुळेच हा प्रश्‍न दिल्‍लीपर्यंत पोहचला, असा दावा आरजी पक्षाने केला आहे.तर आरजी पक्षाने एसटींना आरक्षण मिळण्‍यासाठी काहीच केले नाही.

उलट या पक्षाने आपल्‍या फायद्यासाठी एसटींचा फक्‍त वापर करून घेतला, असा आरोप ‘गाकुवेध फेडरेशन’ या संघटनेच्‍या पदाधिकाऱ्याने केला आहे.

आरजीचे दक्षिण गाेव्‍याचे उमेदवार रुबर्ट परेरा यांनी आरजी एसटी विभागाचे अध्‍यक्ष प्रेमानंद गावडे यांच्‍याबरोबर घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत गोव्‍यात एसटींना राजकीय आरक्षण मिळावे यासाठी जे आंदाेलन सुरू झाले होते त्‍याला पाठिंबा दिला होता. या आंदोलनात आरजी पक्षाने उडी घेतल्‍यानेच भाजपावर दबाव येऊन त्‍यांनी गाेव्‍याचे शिष्‍टमंडळ केंद्र सरकारसमोर नेले असा दावा केला.

मात्र, आता भाजपचेच काही नेते आरक्षणाचे विधेयक संमत झाले आहे, असे सांगून गोव्‍यातील एसटी समाजातील मतदारांची दिशाभूल करत आहेत, असाही आरोप केला.

परेरा यांच्‍या आरोपांना उत्तर देताना ‘गाकुवेध फेडरेशन’चे सरचिटणीस रुपेश वेळीप यांनी आरजी पक्षाचा आमच्‍या आंदोलनाला पाठिंबा होता तर आम्‍ही निवडणुकीवर बहिष्‍कार घालण्‍याचे जे आवाहन केले होते, त्‍याला पाठिंबा का दिला नाही, असा सवाल केला.

विधानसभेत आमदार बोरकर गप्पच !

विधानसभेत आमचे एसटींचे प्रश्‍न आपचे वेंझी व्‍हिएगस, गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई आणि काँग्रेसचे युरी आलेमाव यांनी मांडले. पण त्‍यावेळी आरजीचे आमदार विरेश बोरकर यांनी गप्‍प राहणेच पसंत केले. आजपर्यंत आरजीने आपल्‍या राजकीय फायद्यासाठी एसटी समाजाचा फक्‍त वापर करुन घेतला. त्‍यांच्‍या भल्‍यासाठी त्‍यांनी काहीच केले नाही, असा रुपेश वेळीप यांनी आरोप केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT